एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे …

एचडीएफसी बँकेच्या मोबाइल बँकिग अ‍ॅपचा वापर करत असाल तर आता २९ फेब्रुवारीनंतर ते अ‍ॅप निष्क्रिय होणार आहे.

२९ फेब्रुवारीनंतर तुम्ही या अ‍ॅपचा वापर करुन पैशांचा व्यवहार करु शकणार नाहीत.

बँकेकडून याबाबत ग्राहकांसाठी एसएमएसद्वारे अलर्ट जारी करण्यात आला आहे.

२९ फेब्रुवारीनंतर मोबाइल बँकिंगसाठी एचडीएफसी बँकेचे जुने अ‍ॅप काम करणार नाही.

पण बँकेचे लेटेस्ट व्हर्जन अपडेटेड अ‍ॅप प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहे.

काही महिन्यांपूर्वी एचडीएफसीच्या मोबाइल अ‍ॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता.

त्यामुळे अनेक ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला. पैशांच्या व्यवहारामध्ये अनेकांना खूप अडचणी येत होत्या.

त्यानंतर कंपनीने नवीन अ‍ॅप आणले. नवीन अ‍ॅप बनवताना बँकेने सुरक्षेवर अधिक भर दिला.

पण, अद्याप अनेक ग्राहकांनी नवे अ‍ॅप डाउनलोड केलेले नाही किंवा त्यांना माहिती नाही.

त्यामुळे बँकेकडून ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती दिली जात आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts