लाईफस्टाईल

Renting vs Buying a house : शहरात राहायचे तर कर्ज काढून घर घेणे फायद्याचे राहील की भाड्याच्या घरात राहणे ?

Renting vs Buying a house : आपल्याला असे बरेच व्यक्ती माहीत असतील की ते नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने शहरांमध्ये राहतात. जेव्हा ते शहरांमध्ये कामानिमित्त किंवा नोकरीनिमित्त जातात तेव्हा ते काही कालावधी करिता रेंट म्हणजेच भाड्याच्या घरात राहतात.

परंतु जसजसा माणूस शहरी वातावरणात रमतो किंवा त्या ठिकाणी सेटल म्हणजेच स्थिरस्थावर झाल्याची भावना त्याच्यात निर्माण होते. त्यावेळेस व्यक्ती त्या शहरांमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहू लागतो व त्या दृष्टीने प्रयत्न देखील करतो.

दुसऱ्या दृष्टिकोनातून जर आपण शहरात घर घेण्याचा विचार केला तर आर्थिक दृष्ट्या ते खूपच खर्चिक आहे. कारण शहरांमध्ये जागा किंवा घर किंवा फ्लॅट यांच्या किमती गगनाला पोहोचलेले आहेत. तसेच अशा ठिकाणी घर घेणे आता फार सोपे झालेले आहे कारण घराची जी काही एकूण किंमत असते त्यापैकी बराच मोठा वाटा हा वित्तीय संस्था किंवा बँकांच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात आपल्याला मिळतो.

एकूण रकमेच्या काही टक्के तुम्ही डाऊन पेमेंट भरले तरी तुम्हाला बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊन घर खरेदी करता येते. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये मात्र घेतलेल्या कर्जाचे ईएमआय भरताना तुमची आर्थिक घडी विस्कटू शकते. याच दृष्टिकोनातून आपण तुम्ही स्वतःचे घर किंवा फ्लॅट खरेदी करावा की भाड्याने राहावे? या अँगलने काही गोष्टी समजून घेणार आहोत.

काही आकडेवारीने समजून घेऊ हा मुद्दा

आपल्यापैकी बहुतेकांची टू बीएचके चा फ्लॅट विकत घेण्याची इच्छा असते. साधारणपणे जर आपण शहरानुसार विचार केला तर वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या फ्लॅटच्या किमती असतात.

यामध्ये आपण जर मुंबई जवळ असलेल्या कल्याण किंवा डोंबिवली चा विचार केला तर त्या ठिकाणी टू बीएचके फ्लॅटची किंमत साधारणपणे 40 लाख रुपये आहे. या किमतीचा जर फ्लॅट तुम्हाला खरेदी करायचा असेल तर तुम्हाला पंधरा टक्के डाऊन पेमेंट करावे लागणार आहे.

म्हणजेच तुम्हाला पाच ते सहा लाख रुपये डाऊन पेमेंटपोटी भरणे गरजेचे आहे. त्यानंतर देखील खरेदी करिता लागणारे मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क आणि ब्रोकरेज स्वरूपातील शुल्क तुम्हाला स्वतंत्रपणे भरावे लागते. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही घर घेता तेव्हा तुम्हाला त्यामध्ये अनेक फर्निचर किंवा इतर आवश्यक सोयीसुविधा उभारणे देखील गरजेचे असते.

या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला घराच्या किमती व्यतिरिक्त चार लाख रुपये अतिरिक्त खर्च करणे गरजेचे असते. म्हणजे साधारणपणे घरासाठी केलेली डाऊन पेमेंट आणि इतर खर्च एकत्र केले तर तुम्हाला नऊ ते दहा लाख रुपये घराच्या किमती व्यतिरिक्त खर्च करावा लागतो.

तसेच तुम्ही चाळीस लाख रुपये किमतीचा फ्लॅट खरेदी कराल तर पाच लाखाचे डाऊन पेमेंट केल्यावर 35 लाख रुपयांचे कर्ज तुम्हाला मिळते. त्यातल्या त्यात तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्हाला नऊ टक्के एवढा व्याजदर गृह कर्जासाठी आकारला जाईल.

यानुसार आकडेवारी पाहिली तर नऊ टक्के दराने वीस वर्षाकरिता 35 लाख रुपयांच्या गृह कर्जासाठी तुम्हाला 31,490 रुपयाचा ईएमआय भरणे गरजेचे आहे. तसेच डाऊनपेमेंट आणि इतर गोष्टींवर तुम्हाला दहा लाख रुपये खर्च करणे अपेक्षित आहेत. त्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर हा आकडा खूप गुंतागुंतीचा आणि आर्थिक समस्या निर्माण होईल अशा पद्धतीचा दिसून येतो.

रेंट किंवा भाड्याने राहणे फायद्याचे कसे?

समजा तुम्ही स्वतःचे घर घेण्याव्यतिरिक्त भाड्याच्या घरामध्ये राहायचे ठरवले तर तुम्हाला फायदेच फायदे मिळू शकतात. मोठ्या शहरांमध्ये तुम्ही पंधरा हजार रुपये मासिक भाड्याने घर मिळू शकते. अशाप्रकारे तुम्ही दर महिन्याला 16 हजार रुपयांची बचत करू शकतात.

या सोळा हजार रुपयांची केलेली बचत जर तुम्ही चांगल्या गुंतवणूक योजनेमध्ये गुंतवली तर तुम्ही कोटी रुपयांचा फंड तयार करू शकतात. समजा तुम्ही एसआयपी मध्ये वीस वर्षाकरिता दर महिन्याला 16000 रुपये गुंतवले तर दहा ते बारा टक्का परतावा तुम्हाला मिळू शकतो. दर महिन्याला वीस वर्षाकरिता 16 हजार रुपये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला वीस वर्षानंतर १.६० कोटी रुपये मिळतील.

यामध्ये तुमची गुंतवणूक वीस वर्षात 38 लाख रुपयांची होईल. म्हणजेच एसआयपीमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले तर वीस वर्षानंतर तुमच्याकडे 2.42 कोटी रुपयांचा निधी जमा होऊ शकतो. दुसरे म्हणजे तेव्हा तुम्ही घर घ्याल तेव्हा तुम्ही मुद्रांक शुल्क,

ब्रोकरेज आणि घरातील इतर सोयी सुविधा यासाठी जो काही दहा लाख रुपये खर्च करणार आहात तो जर तुम्ही एकरकमी एसआयपीमध्ये गुंतवला तर वीस वर्षांनी बारा टक्के वार्षिक व्याजदराने ही गुंतवणूक वीस वर्षात 97 लाख रुपये होते आणि पंधरा टक्के दराने ती एक कोटी 64 लाख रुपये होईल.

अशा पद्धतीने तुम्ही शहरात राहण्यासाठी स्वतःचे घर घेण्यापेक्षा भाड्याने घरात राहणे चांगले व उरलेला पैसा चांगल्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करून आर्थिक भविष्य सुरक्षित करणे कधीही चांगले ठरेल.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts