Fire Cracker Burn : देशभरात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. अनेकजण फटाके फोडून दिवाळी साजरी करतात. मात्र अनेकदा फटाके फोडण्याचा प्रयत्न करत असताना फटाक्यांमुळे दुखापत होते. अश्या वेळी योग्य ती काळजी घ्यावी, जाणून घ्या यासाठीचे काही सोपे उपाय.
सर गंगाराम हॉस्पिटल, नवी दिल्लीचे प्लॅस्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन डॉ. रमण शर्मा यांच्या मते, फटाके किंवा इतर कोणत्याही गोष्टीमुळे जळल्यास, भाग थंड पाण्याने पूर्णपणे धुवावा. यानंतर जळलेल्या जागेवर बर्न क्रीम किंवा कोणतीही अँटीसेप्टिक क्रीम लावावी.
दरम्यान, हे फक्त प्रथमोपचार आहे आणि हे केल्यानंतर, आपण शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य उपचार करा. असे केल्याने तुम्ही लवकर बरे व्हाल आणि तुमच्या जळलेल्या खुणा कायमच्या दूर होतील. जळल्यानंतर उपचारात दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. फटाक्यांमुळे किंवा इतर कोणत्याही गोष्टीमुळे एखादी व्यक्ती भाजली असेल तर त्या व्यक्तीचे कपडे कात्रीने कापून टाकावेत आणि जळालेली जागा पाण्याने धुवून स्वच्छ चादरीत गुंडाळावी. यानंतर ताबडतोब रुग्णालयात जावे.
दरम्यान,बर्याच वेळी भाजल्यावर टूथपेस्ट लावली जाते. यामळे जखम थंड पडते. मात्र असे नाही, डॉ. रमण शर्मा यांच्या मते, बहुतेक लोक भाजल्यावरती टूथपेस्ट आणि हळद लावतात, परंतु हे धोकादायक ठरू शकते. जळणाऱ्या जागेवर या गोष्टी लावल्याने तेथे घाण साचते, त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत, जळल्यानंतर, फक्त एक साधी क्रीम लावावी.