Dry Fruits Benefit : आहारातील बदलांमुळे लोकांना अशक्तपणा, थकवा यासारखी लक्षणे जाणवू लागतात. मोठ्या प्रमाणात लोकांना अशक्तपणाचा सामना करावा लागतो. ही समस्या महिलांमध्ये दिसून येते. परंतु, अशक्तपणा स्त्री किंवा पुरुष कोणालाही होऊ शकतो. रक्ताच्या कमतरतेची अनेक कारणे असू शकतात.
यामधील एक कारण म्हणजे रक्तातील लाल रक्तपेशी कमी होऊ लागतात. रक्तामध्ये दोन प्रकारच्या पेशी असतात, लाल रक्तपेशी आणि पांढऱ्या रक्तपेशी. खरं तर रक्ताची कमतरता आपण आपल्या आहारात बदल करून पूर्ण करू शकतो, शरीरात रक्ताची कमतरता असल्यास आपण आपल्या आहारात ड्राय फ्रुट्सचा समावेश करू शकतो. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
मनुका
रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी मनुका हे सर्वोत्तम ड्रायफ्रूट मानले जाते. यामध्ये लोह, तांबे आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते, जे लाल रक्तपेशी वाढवण्यास मदत करतात. यामध्ये असलेले लोह हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवते. मनुके दुधात भिजवून सेवन करू शकता.
खजूर
खजूरमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. यामध्ये असलेले आयर्न, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स ॲनिमियाची समस्या दूर करण्यास मदत करतात. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लोह महत्त्वाची भूमिका बजावते. व्हिटॅमिन सी लोहाचे शोषण वाढवते. यामुळे शरीरातील लोहाची पातळी वाढवण्यासाठी खजूर एक चांगला स्रोत मानला जातो.
जर्दाळू
ॲनिमिया झाल्यास तुम्ही तुमच्या आहारात जर्दाळूचाही समावेश करू शकता. रोज 5 ते 6 जर्दाळू खाल्ल्यास ॲनिमियाची समस्या कमी होऊ शकते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, ते पोषक तत्वांचे शोषण सुधारते.
अंजीर
अंजीरमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स, लोह, तांबे, व्हिटॅमिन बी आणि इतर खनिजे आढळतात. याचे सेवन केल्याने अशक्तपणापासून मुक्ती मिळते. यामुळे हिमोग्लोबिनची पातळी सुधारते. यासाठी तुम्ही दोन ते चार अंजीर पाण्यात किंवा दुधात भिजवून रोज खाऊ शकता. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते.
याशिवाय इतर सुक्या मेव्यांचा आहारात समावेश करून तुम्ही अनेक आजारांपासून बचाव करू शकता. सुक्या मेव्यामध्ये असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. अशक्तपणावर मात करण्यासाठी, तुम्हाला आहारासोबत तुमच्या जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला दिला जातो.