IRCTC Tour Package : देशात आता सर्वत्र मान्सून सक्रिय होत आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये मान्सून सक्रिय देखील झाला आहे. जर यंदाच्या पावसाळ्यात तुम्हाला फिरायला जायचे असेल तर उटी हे पर्यटन स्थळ तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते.
उटीमध्ये अनेक सुंदर पर्यटन ठिकाणे आहेत. त्यांना तुम्ही भेट देऊन तुमच्या सहलीचा आंनद वाढवू शकता. बजेट कमी असेल तर घाबरू नका. कारण आता IRCTC पावसाळ्यात उटी फिरण्यासाठी स्वस्त टूर पॅकेज सादर करण्यात आले आहेत.
IRCTC ची ही टूर पॅकेज कुर्ग ते म्हैसूर, उटी, बंगलोर प्रवास करण्याची संधी देत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटनुसार पॅकेज घेऊन उटी फिरण्याचा आनंद घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया IRCTC च्या टूर पॅकेजबद्दल…
IRCTC टूर पॅकेज
IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला कर्नाटक, केरळ, बेंगळुरू आणि तामिळनाडूच्या पश्चिम घाटांनाही भेट देता येणार आहे. IRCTC चे हे टूर पॅकेज 10 ऑगस्टला विशाखापट्टणम मधून सुरु होणार आहे. तसेच ते 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी आहे. १५ ऑगस्टला तुमचे हे टूर पॅकेज संपेल. ज्यामध्ये तुम्ही फ्लाइटने प्रवास करू शकता.
या सुविधा मिळतील
IRCTC च्या उटी फिरण्याच्या पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक सुविधा दिल्या जातील. या पॅकेजमध्ये तुम्हाला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळत आहे. तसेच 5 नाश्ता आणि 5 रात्रीचे जेवण, 5 रात्री डिलक्स हॉटेलमध्ये निवास, प्रवास विमा, IRCTC टूर एस्कॉर्ट सेवा, प्रेक्षणीय स्थळांसाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल.
IRCTC च्या टूर पॅकेजची किंमत
IRCTC कडून उटी फिरण्यासाठी वेगवेगळी टूर पॅकेज सादर करण्यात आली आहेत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार टूर पॅकेज घेऊ शकता. तुम्ही एकटे जाणार जाणार असाल तर तुम्हाला 35,210 रुपये खर्च करावे लागतील.
तसेच तुम्ही दोन व्यक्ती उटी फिरण्यासाठी जाणार असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 26,650 रुपये भाडे द्यावे लागेल. तसेच IRCTC कडून जर तुम्ही तीन व्यक्ती जाणार असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 25,875 रुपये भाडे द्यावे लागेल.
जर तुमच्यासोबत प्रवासात तुमची मुले असतील तर तुम्हाला मुलासाठी वेगळी फी भरावी लागेल. 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी, पलंगासह 23,715 रुपये आणि बेडशिवाय 25,035 रुपये पॅकेजची किंमत आहे. त्याचप्रमाणे, जर मूल 2 वर्ष ते 4 वर्षांचे असेल तर भाडे 7650 रुपये आहे.
IRCTC ने ट्विट करून माहिती दिली-
IRCTC कडून या टूर पॅकेजबद्दल ट्विट करून माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही स्वस्तात भारताच्या दक्षिणेतील सुंदर ठिकाणे पाहू शकता. तुम्हाला हे टूर पॅकेज बुक करायचे असेल तर IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते.