लाईफस्टाईल

Drinking Boiled Water : पावसाळ्यात दिवसभर गरम पाणी पिणे योग्य आहे का? वाचा सविस्तर..

Drinking Boiled Water : सर्वत्र पावसाळा सुरु झाला आहे. अशास्थितीत नळाला पिण्याचे पाणी गढूळ येणे ही सामान्य समस्या आहे, म्हणूनच पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात लोक उकळून पाणी पिणे पसंत करतात. गरम पाण्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

पण दिवसभर गरम पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? तसेच हे कितपत योग्य आहे? दिवसभर गरम पाणी पिल्याने आपल्या शरीरावर काय परीणाम होतात याबद्दल आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत, सर्व प्रथम आपण त्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

गरम पाणी पिण्याचे फायदे :-

अनेकांना बद्धकोष्ठता, ॲसिडिटी तसेच पोट साफ न होण्याची तक्रार सामान्य आहे. अशावेळी गरम पाणी पिणे खूप फायदेशीर मानले जाते, यामुळे पोटातील घाण निघून जाते, आणि तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवते.

गरम पाणी पिण्याने शरीरातील अनावश्यक पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. गरम पाण्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि आपल्याला घाम येतो. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास फायदा होतो. तसेच आपल्याला सर्दी-कफ झाला असेल तर गरम पाणी प्यायल्याने बराच आराम मिळतो.

वाढत्या वयात त्वचेशी संबंधित अनेक समस्या जाणवू लागतात, अशीच एक समस्या म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे. पण नियमितपणे गरम पाणी प्यायल्याने त्वचेतील पेशी उत्तेजित राहतात आणि त्या सुरकुतण्याची क्रिया काहीशी मंदावते. त्यामुळे गरम पाणी प्यायल्यास त्वचा मऊ तर दिसतेच पण तुम्ही दिर्घकाळ तरुण दिसण्यास मदत होते.

वजन कमी करण्याच्या प्रवासात देखील गरम पाणी फायद्याचे आहे. सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम वाढतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.

जर तुम्हाला सर्दी किंवा घशाशी निगडीत काही अ‍ॅलर्जी झाली असेल तर गरम पाण्याने ती दूर होण्यास मदत होते. त्यामुळे वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून आपली सुटका होते. सायनसमध्ये सुधारणा होते आणि श्वसनक्रिया सुरळीत होण्यास याचा फायदा होतो.

दिवसभर गरम पाणी पिण्याचे तोटे :-

-पाणी खूप जास्त गरम असेल तर जीभेला त्याचा त्रास होऊ शकतो. जीभ भाजली गेली कर आपली चवही जाण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो जास्त गरम पाणी पिणे टाळले पाहिजे, पाणी गरम करून थंड करून पिले पाहिजे.

-शरीराच्या आत असणाऱ्या अन्ननलिका, पोट यांच्यासाठीही खूप गरम पाणी चांगले नाही. त्यामुळे या अवयवांना काही त्रास होण्याची शक्यता असते.

-एकदम झोपायच्या आधी गरम पाणी प्यायल्याने आपली झोपेची सायकल बिघडू शकते. त्यामुळे जास्त गरम पिणे टाळले पाहिजे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts