Jaggery perfect winter superfood : सर्वत्र थंडीचे वातावरण दिसून येत आहे. हळू-हळू थंडी जाणवू लागली आहे. अशास्थितीत आहारात मोठे बदल केले पाहिजे. कारण या मोसमात लवकर आजारी पडण्याची शक्यता असते. म्हणूनच या मोसमात आहारकडे विशेष लक्ष देणे खूप गरजेचे असते. थंडीच्या या मोसमात अशा काही पदार्थांचा समावेश केला पाहिजे जे तुम्हाला आतून उबदार ठेवतील आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतील.
हिवाळा सुरु होताच अनेकजण पाणी खूप कमी पितात, या मोसमात जेवण जास्त जाते आणि पाणी पिणे कमी होते. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी गुळासारख्या गरम पदार्थांचे सेवन करणे अधिक फायदेशीर मानले जाते. जेवणानंतर गुळाचे सेवन केल्याने अन्न पचण्यासही मदत होते. तसेच तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत होते, याचे सेवन हाडे मजबूत करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. बहुतेक लोकांना साध्या पद्धतीने गूळ खायला आवडतो. पण तुम्हाला माहिती आहे का? आरोग्यासाठी अनेक प्रकारे याचे सेवन केले जाऊ शकते. आजच्या या लेखात आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.
गूळ आणि दूध
हिवाळ्यात गुळासोबत दूध पिल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. गूळ आणि दुधामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि प्रोटीनसह अनेक आवश्यक गुणधर्म असतात. हे सर्व गुण आपल्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. हे मिश्रण वजन कमी करण्यासाठी, निरोगी पचन, लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि शरीरातील शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर मानले जाते. गुळाचे दूध तयार करण्यासाठी अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गूळ दुधात मिसळून सेवन करा.
गूळ आणि तिळाचे लाडू
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती टिकवण्यासाठी तुम्ही गूळ आणि तिळाचे लाडू खाऊ शकता. हे दोन्ही पदार्थ उष्ण असून, तुपात मिसळणे अधिक फायदेशीर आहे. पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी आणि शरीरात उष्णता राखण्यासाठीही याचा फायदा होतो.
गूळ आणि हरभरा
हरभरा गुळासोबत खाणे हे फार जुने खाद्यपदार्थ आहे. हे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, स्नायू आणि हाडे मजबूत करण्यासाठी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यात मदत करू शकते. तुम्ही ते रिकाम्या पोटी किंवा सकाळच्या नाश्त्यातही घेऊ शकता.
गूळ आणि चपाती
गरम चापटी सोबत गुळाचे सेवन करणे केवळ चवदारच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. चपाती आणि गुळातील आवश्यक जीवनसत्त्वे खनिजे पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. याच्या सेवनाने शरीर उबदार राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्त वाढण्यासही मदत होते.