Jyotish Tips : ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा ग्रह तर्कशक्तीचा ग्रह असून कुंडलीनुसार बुध तिसऱ्या आणि सहाव्या घरावर राज्य करत असतो. त्यामुळे ज्यावेळी या ग्रहाचे राशी परिवर्तन होते त्यावेळी अनेक राशींवर त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम होतो.
नुकतेच या ग्रहाने सिंह राशीत संक्रमण केले आहे. याचा खूप मोठा फायदा 8 राशींना होणार आहे. त्यांच्यासाठी पुढील 68 दिवस खूप लकी असणार आहेत. त्यांना कसलीच कमतरता भासणार नाही. तसेच त्यांची रखडलेली कामे या काळात पूर्ण होतील.
मेष
हे लक्षात घ्या की बुधाचे संक्रमण आर्थिक स्थितीवर नाश करेल. तुमच्या घाईघाईने घेण्यात आलेल्या निर्णयामुळे तुमचा पैसा अडकू शकतो, तसेच चुकूनही इतरांवर विश्वास ठेवू नका.
वृषभ
येणारा काळ या राशींच्या लोकांसाठी थोडा कठीण असणार आहे. तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात अडकू शकता. त्यामुळे शक्य तितकी शांतता राखा.
मिथुन
कुटुंबात मोठा धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. तसेच सर्व कामात अपेक्षित यश मिळून नफा होईल.
कर्क
बुधाचे संक्रमण कर्क रास असणाऱ्या लोकांसाठी खूप चांगली बातमी घेऊन येईल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यापासून व्यावसायिक जीवनापर्यंत सर्वत्र तुम्हाला लाभ होईल.
सिंह
समजा तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत असाल तर बुधाचे संक्रमण तुम्हाला यश देईल. तुम्ही मोकळ्या मनाने पुढे जाऊ शकता.
कन्या
तुमचे वैवाहिक जीवन तणावपूर्ण असेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या करिअरसोबतच कुटुंबालाही वेळ द्या, नाहीतर तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल.
तूळ
बुधाचे संक्रमण आर्थिक लाभ घेऊन येत असून या काळात तुमची पैशाची टंचाई दूर होईल. इतकेच नाही तर तुमहाला वडिलोपार्जित संपत्तीही मिळू शकते.
वृश्चिक
या राशींच्या लोकांसाठी येणारा काळ अस्थिर राहील. कारण तुम्ही जे काही कराल त्यात अनिश्चितता असणार आहे. परंतु घाबरून न जात प्रयत्न करत राहा.
धनु
तुम्हाला तुमच्या जीवनातील जटिल निर्णय घेण्यास भाग पाडू शकेल. तसेच तुम्ही जे काही कराल ते तुमच्या घरातील मोठ्यांच्या सल्ल्याने करा.
मकर
तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येईल. तुमची तुमच्या जुन्या मित्रांशी भेट होऊ शकते. तसेच तुमहाला भागीदारी व्यवसायातून लाभ होईल.
कुंभ
वादविवाद शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते.
मीन
बुधाचे संक्रमण तुम्हाला यशाच्या नवीन शिखरावर घेऊन जाऊ शकते. ज्या क्षेत्रात तुम्ही हात आजमावलात, त्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल. परंतु त्यासाठी फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करत रहा.