Jyotish Tips : ज्योतिषशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितले आहेत, ज्याचा तुम्ही अवलंब केला तर तुमच्या जीवनात खूप सुख-समृद्धी येऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात काही राशींचे ग्रह आणि नक्षत्र असे आहेत की ज्यांना थोडी मेहनत केली तर अपार यश मिळते.
त्याशिवाय अनेकांना रात्रंदिवस मेहनत करूनही यश मिळत नाही. लवकरच गुरूचे संक्रमण होणार आहे. ज्याचा काही राशींना खूप फायदा होणार असून त्यांचे नशीब बदलू शकते. कोणत्या आहेत या राशी? जाणून घ्या सविस्तर.
ह्या राशींसाठी फायद्याचे असेल संक्रमण
मिथुन रास
हे लक्षात घ्या की, प्रतिगामी बृहस्पति मिथुन राशीसाठी विपरीत राजयोग निर्माण करत असून आता अशा परिस्थितीत मिथुन रास असणाऱ्या लोकांची अनेक दिवसांपासून खोळंबलेली महत्त्वाची ती आता पूर्ण होऊ शकणार आहेत. त्यामुळे तुमच्याकडे मुबलक प्रमाणात पैसे येतील. तुम्हाला आर्थिक अडचण येणार नाही. तसेच तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत चांगला वेळ घालवू शकता. समजा तुमच्या नातेसंबंधात काही मतभेद असतील तर 4 सप्टेंबर नंतरचा काळ देखील त्यांना दूर करण्यासाठी खूप चांगला आहे. महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही भगवान शिवाची उपासना केली तर तुम्हाला खूप मोठा फायदा होईल.
तूळ रास
ज्या लोकांची रास तूळ आहे त्यांच्यासाठी आता सुवर्ण काळ येणार आहे. या लोकांच्या आर्थिक प्रगतीसाठीही काळ पूर्णपणे अनुकूल असून त्यांना करिअरमध्ये येणाऱ्या सर्व समस्या सुटू शकतील. तसेच आयुष्यातील दीर्घकाळापासून असणारी नकारात्मकता संपेल. शिवाय सकारात्मक ऊर्जा वाढत जाईल. तसेच त्यांचा आत्मविश्वासही वाढेल. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. या राशींच्या लोकांनी रोज रात्री ९ नंतर सुंदरकांड पठण करावे.
सिंह रास
प्रतिगामी बृहस्पतिचे संक्रमण सिंह राशीसाठी देखील खूप फायद्याचे आहे. ही रास असणाऱ्या लोकांची येणाऱ्या काळात धार्मिक कार्यात रुची वाढत जाईल,तसेच तुमच्या घरात येणाऱ्या काही दिवसात धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. तसेच आत्तापर्यंत चालत आलेला कठीण काळ संपून तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून भावनिक आधार येणाऱ्या दिवसात मिळेल. तसेच तुम्हाला घरामध्ये काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही दररोज सूर्याला जल अर्पण करून आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा.