Shares market : शेअर्स मार्केट अशी जागा आहे की जेथे काही स्टॉक एका रात्रीत मालामाल करून टाकतात. गेल्या आठवडय़ात निफ्टी आणि सेन्सेक्सचा रिटर्न अर्धा टक्का राहिला आहे. पण असे काही शेअर्स आहेत की ज्यांनी लोकांना श्रीमंतच करून टाकले आहे.
एका शेअरने तर गुंतवणूकदारांचे पैसे पाच दिवसात डबल केले आहेत. तुम्हालाही अशा शेअर्सबद्दल जाणून घ्यायचं असेल तर अशा टॉप ५ शेअर्सची माहिती येथे देत आहोत. या शेअर्सने गेल्या आठवड्यात ५४ ते ९२ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. चला जाणून घेऊया.
N K Industries : सोमवारी हा शेअर ३८.३५ रुपयांवर बंद झाला होता. शुक्रवारी हा शेअर ७३.४९ रुपयांवर बंद झाला होता. अवघ्या पाच दिवसांत या शेअरने ९१.६३ टक्के परतावा दिला आहे.
Tirupati Sarjan Ltd : सोमवारी हा शेअर १०.३० रुपयांवर बंद झाला होता. शुक्रवारी हा शेअर १९.१९ रुपयांवर बंद झाला. अवघ्या पाच दिवसांत या शेअरने ८६.३१ टक्के परतावा दिला आहे.
Hindustan Bio Sciences Ltd : सोमवारी हा शेअर ५.६८ रुपयांवर बंद झाला होता. शुक्रवारी हा शेअर ९.५४ रुपयांवर बंद झाला. त्यामुळे अवघ्या पाच दिवसांत या शेअरने ६७.९६ टक्के परतावा दिला आहे.
Techknowgreen Solutions Ltd : सोमवारी हा शेअर १२२.२५ रुपयांच्या पातळीवर होता. शुक्रवारी हा शेअर १८९ रुपयांच्या पातळीवर बंद झाला. अशाप्रकारे, या स्टॉकने अवघ्या ५ दिवसांत सुमारे ५४.६० टक्के परतावा दिला आहे.
Sky Gold : सोमवारी हा शेअर ३४७.६५ रुपयांवर बंद झाला होता. शुक्रवारी हा शेअर ५३६.५५ रुपयांवर बंद झाला. अवघ्या पाच दिवसांत या शेअरने ५४.३४ टक्के परतावा दिला आहे.
टीप : येथे आम्ही शेअर्सच्या परताव्याची माहिती देतो, हा गुंतवणुकीचा सल्ला नाही