Lifestyle News : बऱ्याच जणांना जुन्या नोटांचे (Old Note) किंवा जुने सिक्के (Old coins) गोळा करून ठेवण्याचा छंद (hobby) असतो. त्यामध्ये शुभ-अशुभ किंवा एखाद्या क्रमांकावर खूप विश्वास असतो. आपल्याकडे जर अशी नोट किंवा सिक्का असेल तर आपण मालामाल होऊ शकतो, अशी त्यांची भावना असते.
सध्याचा काळात अशा प्रकारचे छंद जोपासणारे व्यक्तींची काही कमी नाही. तुमचा हा छंद तुम्हाला भविष्यात करोडपती (Millionaire) बनवू शकतो. गेल्या काही दिवसांपासून जुन्या नोटा किंवा सिक्के खरेदी विक्री करण्याचा ट्रेंड (Trend) बाजारात (Market) पाहायला मिळत आहे.
तुमच्याकडे 786 नंबरची नोट आहे का?
तुमच्याकडे जर 786 क्रमांकाची नोट असेल तर एका बोलीमध्ये 3 लाख रुपये मिळतील. त्यामुळे तुमच्याकडे नोटांचा संग्रह आणि 786 क्रमांकाच्या नोटांची मालिका असल्यास उशीर करू नका. त्वरीत eBay वेबसाइटवर जा आणि तेथे तुमच्या नोटचे मूल्य मिळवा. eBay वेबसाइट जुन्या नोटा ठेवणाऱ्या लोकांना त्या ऑनलाइन विकण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते.
विक्रेते (Sellers) त्यांच्या नोटा आणि नाणी चांगल्या प्रमाणात विकण्यासाठी खरेदीदारांशी बोलू शकतात. अशा दुर्मिळ (Rare) आणि पुरातन (Oldest) नोटा खरेदी करण्यासाठी खरेदीदार मोठ्या प्रमाणात खर्च करतात.
Ebay.com वर जुन्या नोटा कशा विकायच्या?
पायरी 1: www.ebay.com वर जा
पायरी 2: मुख्यपृष्ठावर, नोंदणी वर क्लिक करा आणि विक्रेता म्हणून स्वतःची नोंदणी करा.
पायरी 3: तुमच्या नोटेचे स्पष्ट आणि योग्य चित्र घ्या आणि ते प्लॅटफॉर्मवर अपलोड करा. जुन्या नोटा आणि नाणी खरेदी करण्यासाठी प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या लोकांना eBay तुमची जाहिरात दाखवेल. पायरी 4: नोट खरेदी करण्यास इच्छुक असलेले तुमची जाहिरात पाहिल्यानंतर तुमच्याशी संपर्क साधतील. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून नोटा विकू शकता.
माता वैष्णोदेवीच्या नाण्याला मागणी
कॉईन बझार नावाच्या वेबसाइटवर जुन्या आणि दुर्मिळ चलनी नोटांची खरेदी-विक्रीही केली जाते. जुन्या 1, 2, 5 रुपयांच्या नोटा काही अटींसह तुम्हाला लाखांमध्ये फायदे देऊ शकतात. जर तुमच्याकडे 5 आणि 10 रुपयांची नाणी असतील, ज्यावर माता वैष्णो देवी दिसत असेल, तर तुम्ही त्यांना लिलावात टाकून लाखो रुपये कमवू शकता.
ही नाणी सरकारने 2002 मध्ये जारी केली होती आणि त्यांना जास्त मागणी आहे. माता वैष्णोदेवीबद्दल हिंदूंना प्रचंड श्रद्धा असल्याने अशा नाण्यांसाठी लाखो रुपये खर्च करण्याची तयारी असलेले अनेक लोक आहेत.
एक रुपयाच्या नोटेसाठी हजारो रुपये मिळू शकतात
अलीकडेच नाणे बाजारात एक रुपयाच्या जुन्या नोटेची जाहिरात आली. यानुसार, जर तुमच्याकडे 1 रुपयाची नोट असेल आणि ती त्यांच्या मानकांशी जुळत असेल, तर तुम्ही त्याऐवजी 45,000 रुपये कमवू शकता. तुमच्या जुन्या नोटा तपासण्यापूर्वी, अटी जाणून घ्या.
या वेबसाइटवर तुम्ही काहीही न करता थेट घरी बसून ४५,००० रुपये कमवू शकता. तुम्हाला फक्त एक रुपयाची जुनी नोट हवी आहे जी 1977-1979 मधील आहे. जुन्या एक रुपयाच्या नोटेवर वित्त मंत्रालयाचे माजी प्रधान सचिव हिरुभाई एम पटेल यांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. ज्यांनी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वात 1977-1979 मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला होता.