लाईफस्टाईल

देशातील अनेक ‘बिग बाजार’ आज बंद… समोर आले मोठे कारण

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- देशातील दुसरी सर्वात मोठी रिटेलर कंपनी असलेल्या फ्युचर रिटेल लिमिटेड कंपनीनं आज आपले बहुतांश ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरचं काम बंद केलं आहे. कंपनीचे बहुतांश ‘बिग बाजार’ स्टोअर आज बंद असल्याचं दिसून आलं आहे.

नेमके काय आहे कारण? :- जाणून घ्या फ्यूचर ग्रूप गेल्या काही महिन्यांपासून आपल्या अनेक स्टोअर्सचं भाडं देण्यास असमर्थ ठरत होती. ज्या स्टोअर्सचं भाडं देण्यास फ्यूचर ग्रूप असमर्थ ठरला आहे अशा सर्व स्टोअर्सचा ताबा आता रिलायन्स घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

‘बिग बाजार’मध्ये खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. पण आज फ्यूचर ग्रूपचे अनेक ‘बिग बाजार’ स्टोअर बंद असल्याचं दिसून आलं आहे. तसंच कंपनीच्या वेबसाइटवरही ग्राहकांना ऑर्डर देता येत नाहीय.

वेबसाइट सुरू करताच संबंधित संकेतस्थळ अपग्रेड करण्याचं काम सुरू आहे असा मेसेज दाखवत आहे. आता रिलायन्स इंडस्ट्री किशोर बियाणी यांच्या नेतृत्त्वाखालील फ्यूचर ग्रूपच्या अनेक रिटेल स्टोअरचं रिब्रँडिंग करणार आहे.

त्यामुळे ‘बिग बाजार’चं उद्यापासून नवं रुपडं पाहायला मिळणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीकडून फ्यूचर ग्रूपच्या कर्मचाऱ्यांना नोकरीच्या ऑफर्स देखील येऊ लागल्या आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts