Ajab Gajab News : विविधतेमध्ये एकता ही भारताची जगभरात ओळख आहे. कारण भारतात असंख्य जाती, अनेक धर्म आणि अगणित समाजाचे लोक नांदतात. पण तुम्हाला कदाचित माहिती नसेल की भारतामध्ये एक ‘मिनी आफ्रिका’ देखील आहे.
भारतातील मिनी आफ्रिका हे असे ठिकाण आहे की, जिथे गेल्यावर तुम्हाला भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा गर्वही वाटेल आणि आश्यर्यही. तुम्ही म्हणाल की, भारतामध्ये मिनी आफ्रिका कुठे बरे असू शकेल ? तर याचे उत्तर आहे गुजरात राज्य. भारतातील गुजरात या राज्यामध्ये एक गाव असे आहे की जे मिनी आफ्रिका म्हणून ओळखले जाते.
येथे राहणारे लोक हुबेहूब आफ्रिकन लोकांसारखे दिसतात. त्यांचे रंग-रूप आणि देहयष्टी हुबेहुब आफ्रिकन लोकांसारखी आहे. मात्र, हे लोक भाषा बोलतात गुजराती. त्यांच्या बहुतांश प्रथा-परंपरा गुजराती लोकांसारख्याच आहेत.
गुजरातमधील या अनोख्या गावाचे नाव आहे जांबूर. वरवर पाहता हे गाव भारतातील अन्य गाव-खेड्यांसारखेच आहे. मात्र, या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे वास्तव्य करून असलेला सिद्दी नावाचा समाज.
सिद्दी समाजाचे हे लोक आफ्रिकन वंशाचे आहेत. या समाजातील गरीब लोकांना ७ व्या शतकामध्ये अरबी आक्रमणकर्त्यांनी आपल्यासोबत गुलाम बनवून आणले होते. हे लोक तेव्हापासून भारतातच वास्तव्य करून आहेत.