लाईफस्टाईल

Walnut Benefits : अक्रोड खाण्याचे चमत्कारिक फायदे; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत?

Walnut Benefits : निरोगी आरोग्यासाठी आपल्याला नेहमीच ड्राय फुड खाण्याचा सल्ला दिला जातो. ड्राय फूड्स आपल्या आहारात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. ड्राय फूड्सच्या सेवनाने सर्दीपासून संरक्षण तर होतेच शिवाय रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. साधारणपणे आपण काजू, बदाम, मनुका यांसारखे ड्रायफ्रूट्स खातो, पण अक्रोड हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अक्रोड खाण्याचे फायदे आणि योग्य पद्धत सांगणार आहोत.

बदामाप्रमाणेच अक्रोड रात्रभर भिजत ठेवून खाणे अधिक फायदेशीर ठरते. अक्रोड कच्चे खाण्याऐवजी रात्रभर भिजत ठेवा आणि नंतर खा. कारण अक्रोड उष्ण असते, त्यामुळे त्याचे सरळ सेवन करणे शक्यतो टाळा. पण लक्षात घ्या अक्रोड जरी फायदेशीर असले तरी देखील त्याचे जास्त प्रमाणात सेवन करू नका. कोणत्याही गोष्टीचे जास्त प्रमाणात सेवन केले तर त्याचे नुकसानही असतात.

अक्रोड खाण्याचे फायदे :-

-अनेक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, दररोज 2-3 अक्रोड खाल्ल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो. तसेच साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

-कॅल्शियम आणि व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे शरीरातील वेदनांवर घरगुती उपाय म्हणून अक्रोड बरेचदा मदत करतात. अक्रोडमध्ये असलेले अल्फा-लिनोलेनिक ऍसिड हाडे मजबूत करते. म्हणूनच हे खूप फायदेशीर मानले जातात.

-रोज अक्रोड खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. याच्या सेवनाने हृदयाशी संबंधित समस्याही दूर होतात.

-जे लोक रोज अक्रोड खातात त्यांची मेंदूची शक्ती वाढते. अक्रोड मेंदूला तीक्ष्ण बनवते. यामध्ये असलेले ओमेगा-३ तणाव दूर करून मेंदू तीक्ष्ण करण्यास मदत करते.

-अक्रोडमध्ये असलेले फायबरचे प्रमाण पाचन समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेमध्येही आराम मिळतो.

-अक्रोड खाल्ल्याने तणाव दूर होतो आणि झोपही चांगली लागते. यामुळे मनही शांत राहते.

-अक्रोडमध्ये बायोटिन आणि व्हिटॅमिन 32 असते. यामुळे केस गळण्याचीही समस्या कमी होते. ज्या व्यक्तींना केस गळतीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.

Renuka Pawar

Recent Posts