Monsoon Travel Tips : देशभरात सध्या मान्सूनचा पाऊस कोसळत आहे. तसेच या पावसामध्ये अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. मात्र अनेकदा फिरायला गेल्यानंतर अनेक चुका होतात. त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो.
पावसाळ्यात कुठेही फिरायला जात असताना सर्वात आगोदर नियोजन करणे महत्वाचे आहे. जर तुम्ही फिरायला जाण्याअगोदर नियोजन केले नाही तर तुम्हाला अनके समस्यांना सामोरे जावे लागेल.
पावसाळ्यात अनेक लोक फिरायला जात असतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी कधीही जाणे टाळावे. तसेच जास्त पावसात देखील घराबाहेर पडणे तुमच्या सहलीचे नियोजन बिघडवू शकते. त्यामुळे खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
योग्य कपडे निवडा
तुम्हीही या पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन केला असेल तर त्याअगोदर तुम्ही तुमची योग्य कपडे निवडणे आवश्यक आहे. तुम्ही परिधान केलेले कपडे आणि सोबत घेऊन जाणारी कपडे सहज सुकतील अशी असावीत. तुम्ही रेन जॅकेट, नायलॉन, पॉलिस्टर ड्रेस इत्यादी हलक्या वजनाचे कपडे सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.
आरामदायक चप्पल किंवा शूज घाला
पावसाळ्यात तुम्ही ट्रेकिंगसाठी जात असाल तर शकतो शूजचा वापर करा. तुम्ही जे शूज घालत आहात ते शूज वॉटरप्रूफ असावेत. तसेच चप्पल किंवा शूज निवडताना ती घसरणार नाहीत अशी निवड. कापड किंवा चामड्याचे शूज घालणे कधीही टाळा.
वॉटरप्रूफ कव्हर सोबत ठेवा
पावसाळ्यात कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत फिरायला जाणार असाल तर तुमच्यासोबत नक्कीच वॉटरप्रूफ कव्हर ठेवा, याचा तुम्हाला पावसात खूप उपयोग होईल. याच्या मदतीने तुम्ही तुमचा कॅमेरा, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू पावसात भिजण्यापासून वाचवू शकता.
पिण्याचे पाणी घेऊन जा
तसेच कुठेही फिरायला जाण्याअगोदर तुम्ही तुमच्यासोबत पिण्याचे पाणी ठेवा. कारण तुम्ही बाहेरचे पाणी पिळत तर तुम्हाला आजारांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे फिरायला जाताना तुमच्या आरोग्याची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे.
ताजे अन्न खा
फिरायला गेल्यानंतर बाहेरचे खराब अन्न खाणे टाळा. संसर्ग आणि रोग टाळण्यासाठी तुम्ही स्वच्छ आणि चांगले पदार्थ खा. चांगल्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटची निवड करा. जेणेकरून तुम्ही फिरून आल्यांनतर आजारी पडणार नाही.
छत्री घेऊन जा
पावसाळ्यात फिरायला जाताना जास्त प्रमाणात भिजणे देखील तुमच्यासाठी घटक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही या दिवसांत फिरायला जाणार असाल तर सोबत छत्री घेऊन जा. या छत्रीच्या मदतीने तुम्ही पावसात भिजण्यापासून स्वतःला वाचवू शकाल.