लाईफस्टाईल

Most Expensive Beers : काय सांगता ! या बिअरची किंमत आहे 4 कोटींच्या पुढे, जाणून घ्या जगातील टॉप 3 बिअर

Most Expensive Beers : जगात दारू पिणाऱ्यांची संख्या जास्त आहे. दारूच्या नावाखाली अनेकजण बिअरचे सेवन करत असतात. जगभरात बिअर पिणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र बाजारात अनेक कंपन्यांची बिअर उपलब्ध आहे.

भारतात बिअरच्या किमती फार जास्त नसल्याने अनेकदा तुम्हीही पाहिले असेल. तसेच भारतात गोव्याच्या ठिकाणी बिअरची किंमत तर फारच कमी आहे. तुम्ही आजपर्यंत स्वस्त बिअरबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल तर मात्र कधी जगातील महागड्या बिअरबद्दल कधी जाणून घेतले आहे का? जगातील सर्वात महागड्या बिअरची किंमत 4 कोटींच्या पुढे आहे. एका बिअरच्या बाटलीत तुम्ही दोन-तीन टॉप मॉडेल बीएमडब्ल्यू खरेदी करू शकता.

जगातील टॉप सर्वात महाग बिअर?

ऑलसोपचे आर्टिक अले

जगातील सर्वात महागड्या बिअरचे नाव ऑलसोपचे आर्टिक अले असे आहे. ही बिअर तुम्हाला कोणत्याही दारूच्या दुकानात मिळणार नाही. तसेच ही बिअर सामान्य माणूस खरेदी करू शकत नाही.

या बिअरच्या एका बाटलीमध्ये तुमच्या तीन पिढ्या आनंद घेऊ शकतात. या बिअरची किंमत तब्बल 5 लाख डॉलर आहे. भारतात या बिअरचा किंमत तब्बल 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ही बिअर 140 वर्षांहून अधिक जुनी असल्यामुळे त्याची किंमत जास्त आहे.

अंटार्क्टिक नेल अले

जगातील सर्वात महागड्या दुसऱ्या बिअरचे नाव अंटार्क्टिक नेल अले आहे. या बिअरमध्ये बिअरमध्ये 10 टक्के अल्कोहोल असते. ही बिअर सामान्य लोकांना उपलब्ध आहे.

या बिअरची किंमत एका बाटलीची किंमत 1 लाख 36 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. सी शेफर्ड कॉन्झर्व्हेशन सोसायटीने उत्खनन केलेल्या अंटार्क्टिक बर्फाच्या वितळलेल्या पाण्यापासून ही बिअर तयार केली जाते.

ब्रूडॉग द एंड ऑफ हिस्ट्री

जगातील सर्वात तिसरे महागडी बिअर ब्रूडॉग द एंड ऑफ हिस्ट्री आहे. ब्रूडॉग द एंड ऑफ हिस्ट्री ही एक स्कॉटिश बिअर आहे. लक्झरी बिअरपैकी ब्रूडॉग द एंड ऑफ हिस्ट्री एक आहे. ही 10 वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आली आहे. जगभरात ही बिअर लोकप्रिय आहे. बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण 55 टक्के आहे. बिअरची किंमत 57 हजार रुपये आहे .

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts