लाईफस्टाईल

Muscle Gain Tips : हिवाळ्यात बॉडी बनवायची आहे?; आहारात करा ‘या’ पदार्थाचा समावेश !

Muscle Gain Tips : हिवाळ्याचा मोसम बॉडी बनवण्यासाठी खूप चांगला मानला जातो. कारण या दिवसात खाल्लेले अन्न चांगल्या प्रकारे पचते. म्हणूनच हे चार महिने लोकं आपल्या बॉडीवर खूप मेहनत घेतात. तसेच या काळात आहाराची देखील विशेष काळजी घेतली जाते. बॉडी बनवण्यासाठी आहारात पहिला पदार्थ समावेश केला जातो तो म्हणजे अंडी, या दिवसात अंडी खाणे खूप फायदेशीर मानले जाते.

अंड्यांमध्ये पुरेशा प्रमाणात प्रथिने आणि इतर पोषक आढळतात. अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरेशा प्रमाणात असतात. यामुळेच शरीराला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी लोक अंड्यांचे भरपूर सेवन करतात, अंड्यांमध्ये फक्त प्रथिनेच नाही तर व्हिटॅमिन बी 12, थायामिन, सेलेनियम आणि रिबोफ्लेविन देखील पुरेशा प्रमाणात आढळतात.

वजन कमी करण्यासाठी, बॉडी बिल्डिंग किंवा स्नायू बनवण्यासाठी अंड्याचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. मसल्स गेन करण्यासाठी किंवा बॉडी बिल्डिंगसाठी अंड्याचे सेवन सर्वात फायदेशीर मानले जाते. यामध्ये असलेले उच्च दर्जाचे प्रथिने आणि 9 आवश्यक अमीनो अ‍ॅसिड स्नायूंच्या उभारणीसाठी खूप फायदेशीर आहेत. आज आपण मसल गेन करण्यासाठी अंडी कशी खावी? चला जाणून घेऊया…

कोणत्याही पदार्थाचे सेवन शरीरासाठी तेव्हाच फायदेशीर ठरते जेव्हा ते योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने सेवन केले जाते. अंडी खाणे मसल्स वाढीसाठी फायदेशीर आहे, परंतु योग्य वेळी ते सेवन न केल्याने तुम्हाला फायद्याऐवजी नुकसान होण्याचा धोका आहे. वर्कआउटनंतर अंडी खाल्ल्याने मसल लवकर बरे होण्यास मदत होते आणि मसलमध्ये उपस्थित चरबी कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. अंडी खाल्ल्याने शरीरातील चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला गती मिळते आणि स्नायूंची घनता वाढण्यासही मदत होते. नियमितपणे संतुलित प्रमाणात अंडी खाल्ल्याने स्नायू लवकर तयार होण्यास मदत होते.

मसल तयार करण्यासाठी प्रथिनांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. प्रथिनांच्या व्यतिरिक्त अंड्यामध्ये फॅट आणि कॅलरीज देखील असतात, परंतु जर तुम्ही अंड्याचा पांढरा खाल्ल्यास तुम्हाला पुरेसे प्रथिने मिळतात. स्नायूंच्या वाढीसाठी, दररोज सकाळी आणि संध्याकाळी उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग खाणे फायदेशीर खूप फायदेशीर मानले जाते. स्नायू तयार करणाऱ्या लोकांनी त्यांच्या आहारात कमीत कमी चरबी आणि जास्तीत जास्त प्रथिनांचा वापर करावा.

जास्त अंडी खाणे हानिकारक?

काही लोक पटकन मसल वाढवण्यासाठी अधिक अंडी खाण्यास सुरवात करतात. अंडींचे दैनिक प्रमाण शारीरिक गरजांनुसार व्यक्तीपरत्वे बदलू शकते. पण एका दिवसात खूप अंडी खाल्ल्याने पोटाच्या गंभीर समस्या, अस्वस्थता, उलट्या आणि मळमळ होऊ शकते. म्हणून, अंडी खाण्यापूर्वी, आपण आपल्या प्रशिक्षक किंवा तज्ञाचा सल्ला घ्यावा.

Renuka Pawar

Recent Posts