Navpancham Rajyog : जोतिषात सूर्य आणि ग्रहांचा राजा बृहस्पति गुरु यांना महत्वाचे स्थान आहे. जेव्हा हे दोन्ही ग्रह आपली हालचाल बदलतात तेव्हा राशींसोबतच पृथ्वीवरही खोलवर परिणाम होतो. अशातच 16 डिसेंबरला सूर्याने धनु राशीत प्रवेश केला आहे, सूर्याने गुरुच्या मूळ राशीत प्रवेश केला आहे. जो काही अनेक राशींसाठी लाभदायक आहे.
सध्या गुरु सध्या मेष राशीमध्ये स्थित आहे, आणि गुरुची नववी दृष्टी सूर्यावर पडत आहे, अशा स्थितीत नवपंचम राजयोग तयार होत आहे. या राजयोगाच्या निर्मितीनंतर तब्बल 12 वर्षांनंतर राज लक्षनसारखा दुर्मिळ राजयोगही तयार झाला आहे, जो 3 राशींसाठी खूप फलदायी मानला जात आहे.
विशेष राजयोगाचा ‘या’ राशींना होणार फायदा !
मेष
या राजयोगामुळे मेष राशीच्या लोकांना बरेच लाभ मिळतील. या काळात करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल. तसेच समाजात मान-सन्मान देखील वाढेल. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. तसेच पद आणि प्रतिष्ठा मिळेल. या काळात जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर चांगल्या संधी तुमची वाट बगत आहेत. या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. तसेच आर्थिक स्थिती सुधारेल.
धनु
डिसेंबरमध्ये सूर्याचा प्रभाव या राशींसाठी लाभदायक असेल. हा योग शुभ परिणाम देईल. या काळात आत्मविश्वास वाढेल आणि दीर्घकाळ लांबलेल्या कामांना गती मिळेल. तसेच या काळात सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यावसायिकांसाठी वेळ चांगली राहील, पदोन्नतीसह पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कामात यश मिळेल तसेच तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत राहील.
सिंह
गुरू आणि सूर्य देवाचा विशेष आशीर्वाद सिंह राशीच्या लोकांवर राहील. तसेच या राजयोगाची निर्मिती खूप फायदेशीर ठरू शकते. व्यवसायात प्रगती आणि करिअरमध्ये यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी अनेक नवीन संधी मिळू शकतात. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. एकूणच हा योग तुमच्यासाठी खूप लाभदायक असेल.