Numerology Mulank 9 : अंकशास्त्रात, जन्मतारीख आणि मूलांक एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतात. अंकशास्त्रात, मूलांकाच्या आधारे त्याचे वागणे, जीवनातील चढ-उतार आणि भविष्य निश्चित केले जाते. नावानुसार ज्या प्रकारे व्यक्तीची राशी तयार होते, त्याच प्रकारे जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो. या मूलांकातून व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेता येतात.
प्रत्येक राशीच्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व वेगळे असते आणि ग्रहांच्या अनुकूलता आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांच्या जीवनात वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण होतात. अशातच आजच्या या लेखात आपण मूलांक 9 असणाऱ्या व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत. महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा अंक मूलांक 9 असतो.
एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे, त्याच्या स्वभावाचा आणि भविष्याचा अंदाज सहज लावता येतो. जन्मतारखेच्या संयोगाने जो आकडा निघतो त्याला मूलांक म्हणतात आणि त्याच्या आधारावर त्या व्यक्तीबद्दल अधिक माहिती जाणून घेता येते, मूलांकनुसार तो व्यक्ती कसा आहे. हे समजून घेता येते.
मूलांक 9 असणारे व्यक्ती कोणत्याही अडचणीशिवाय धैर्याने नवीन क्षेत्रात प्रवेश करतात. तसेच ते हळूहळू यशाच्या मार्गावर पुढे सरकतात. या व्यक्तीच्या लोकांना यश लगेच प्राप्त होते.
हा मूलांक असणारे व्यक्ती कोणतेही काम करण्यापूर्वी जास्त विचार करत नाहीत. किंवा ते नवीन काम हाती घ्यायला घाबरत नाहीत आणि ते धैर्याने पुढे जात राहतात. हीच काही कारणे आहेत ज्यामुळे या लोकांना समाजात खूप मान सन्मान मिळतो.
असे लोक त्यांचे जीवन पूर्णपणे सक्रियपणे जगतात. ते नेहमीच नवीन-नवीन अनुभव घेण्यासाठी उत्सुक असतात. तसेच या व्यक्तींना नवीन गोष्टी लवकर आकर्षित करतात. त्यांच्यात नेहमीच नवीन काही तरी करण्याची ऊर्जा असते.
हे व्यक्ती खुल्या मनाचे असतात, त्यांना कोणत्याही गोष्टीत वारंवार संयम बाळगायला आवडत नाही. त्यांना त्यांचे आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगायला आवडते. या लोकांना चैनीचे जीवन जगायला आवडते. कारण त्यांना जन्मापासूनच प्रसिद्धी आणि आरामात राहण्याची सवयी असते.