Numerology : अंकशास्त्रात, जन्मतारखेनुसार व्यक्तीच्या स्वभावाबद्दल खूप काही जाणून घेता येते. अंकशास्त्रात, मूलांकाच्या आधारे एखाद्या व्यक्तीचे वागणे, किंवा जीवनातील चढ-उतार तसेच भविष्यात घडणाऱ्या गोष्टी जाणून घेता येतात. नावानुसार ज्या प्रकारे व्यक्तीची राशी तयार होते, त्याच प्रकारे जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो. या मूलांकातून व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेता येतात.
उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म महिन्याच्या 11 तारखेला झाला असेल तर त्याची मूलांक संख्या 2 असेल. त्याचप्रमाणे, महिन्याच्या 2, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा देखील मूलांक 2 असेल. आज आम्ही तुम्हाला या मूलांकाच्या मुलींबद्दल काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या क्वचितच माहित असतील.
मूलांक 2 असणाऱ्या मुलींचा स्वभाव
-अंकशास्त्रात, प्रत्येक संख्या कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे. मूलांक 2 बद्दल बोलायचे तर ते थेट चंद्रदेवांशी संबंधित आहे. कुंडलीतील ग्रह नक्षत्राची स्थिती आणि दिशा आणि चंद्र ग्रहाच्या स्थितीच्या प्रभावाच्या आधारावर या लोकांचे जीवन बदलते.
-मूलांक 2 असणाऱ्या मुली स्वभावाने खूप भावूक असतात आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक नात्याची ते अगदी मनापासून काळजी घेतात. या मुली काही गोष्टी लवकर मनाला लावून घेतात, तसेच या मुली थोड्या हळव्या असतात, पण या मुली मानाने खूप चांगल्या असतात, तसेच या मुलींच्या मनात इतरांबद्दल नेहमीच आदर असतो.
-या मुलींच्या मनात खूप प्रेम आणि आपुलकी असते. या मुली त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवर खूप प्रेम करतात आणि त्यांची खूप चांगली काळजी घेतात. तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची अगदी मनापासून सेवा करतात.
-मूलांक 2 च्या मुलींबद्दल असे म्हटले जाते की, त्या खूप चांगल्या पत्नी असल्याचे सिद्ध करतात. त्या त्यांचा संसार अगदी मनापासून करतात, तसेच जोडीदाराला खूप साथ देतात. आणि त्यांच्यासोबत उत्तम संसार करतात.
-या मुली कौटुंबिक स्वरूपाच्या असतात. तसेच त्यांना शक्य तितक्या चांगल्या प्रकारे ते कुटुंब चालवता. ते नातेसंबंधांना खूप महत्त्व देतात आणि त्यांचा हा गुण त्यांना खास बनवतो.
-या मुली पती आणि सासरच्या लोकांसाठी खूप भाग्यवान मानल्या जातात आणि लग्नानंतर त्या संपूर्ण घराचे नशीब फिरवतात. तसेच त्या त्यांच्या पतीसाठी देखील खूप लकी मानल्या जातात.
-या मुलींच्या प्रेमळ आणि काळजी घेण्याच्या स्वभावामुळे त्या एक परिपूर्ण जोडीदार बनतात आणि पतीला नेहमी आनंदी ठेवतात. या मुली खूप मेहनती असतात तसेच या मुली पतीला त्यांच्या करिअरमध्ये खूप पाठिंबा देतात.