Bank Holiday in November : ऑक्टोबर संपण्यास अवघे ५ दिवस शिल्लक असून त्यानंतर पुढचा महिना म्हणजे नोव्हेंबर सुरू होईल. दिवाळी नोव्हेंबरमध्ये आहे, म्हणजे त्या महिन्यात जास्त सुट्ट्या येत आहेत. आता अधिक सुट्ट्या आल्या आहेत,
त्यामुळे तुम्हाला बँकेच्या सुट्ट्या कधी येणार आहेत हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर आताच नियोजन करून ठेवाल.
ही संपूर्ण यादी आहे
– 1 नोव्हेंबर 2023 रोजी बेंगळुरू, इंफाळ आणि शिमला येथे कन्नड राज्योत्सव, करवा चौथसाठी सुट्टी असेल.
– 5 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशात रविवारची सुट्टी आहे.
– 10 नोव्हेंबर 2023 रोजी बांगला महोत्सव आहे ज्यासाठी शिलाँगमध्ये सुट्टी असेल.
– 11 नोव्हेंबर 2023 हा दुसरा शनिवार
– 12 नोव्हेंबर, रविवारी संपूर्ण देशात बँक सुट्टी असेल.
– 13 नोव्हेंबरला गोवर्धन पूजा, लक्ष्मीपूजन होणार असून त्यामुळे कानपूर, आगरतळा, डेहराडून, जयपूर, लखनऊ आणि इंफाळमध्ये सुट्टी असेल.
– लक्ष्मीपूजनामुळे 14 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई, अहमदाबाद, गंगटोक, बेंगळुरू, नागपूर आणि बेंगळुरू येथे बँक सुट्टी असेल.
– 15 नोव्हेंबर 2023 रोजी कानपूर, लखनौ, कोलकाता, शिमला, इंफाळ आणि गंगटोकमध्ये भाई दूज, लक्ष्मीपूजनासाठी सुट्टी असेल.
– 19 नोव्हेंबरला रविवारी संपूर्ण देशात सुट्टी आहे
– 20 नोव्हेंबरला छठ पूजा आहे, त्यामुळे रांची आणि पाटणामध्ये बँक सुट्टी असेल.
– सांग कुत्स्नेमसाठी 23 नोव्हेंबरला शिलाँग आणि डेहराडूनमध्ये बँक सुट्टी असेल.
– 25 नोव्हेंबर हा चौथा शनिवार
– 26 नोव्हेंबरला रविवार असल्याने बँका बंद राहतील.
– 27 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंतीनिमित्त नवी दिल्ली, तेलंगणा, जयपूर, कोलकाता, मुंबई, लखनौ, नागपूर, जम्मू, कानपूर, चंदीगड, हैदराबाद, डेहराडून, भोपाळ, रायपूर, शिमला आणि रांची येथे बँका बंद राहतील.
– 30 नोव्हेंबरला कनक दास जयंतीनिमित्त बंगळुरूमध्ये बँकेला सुट्टी असेल. या सर्व सुट्ट्या आरबीआयने घोषित केलेल्या सुट्ट्या आहेत.