लाईफस्टाईल

OnePlus Pad Go : OnePlus चा नवीन टॅबलेट लॉन्च , 8000mAh बॅटरीसह मिळतील शानदार फिचर्स

OnePlus Pad Go Launched in India : OnePlus ने आपलाचा नवीन टॅबलेट OnePlus Pad Go भारतात लॉन्च केला आहे. OnePlus Pad Go हा कंपनीचा दुसरा टॅबलेट आहे. याआधी वनप्लस पॅड भारतात फेब्रुवारी 2023 मध्ये लॉन्च झाला होता.

आता नवीन आलेला हा OnePlus Pad Go हा 20000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार आहे. OnePlus Pad Go चा डिस्प्ले 11.35 इंच आहे. यात MediaTek प्रोसेसर, 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज अशी फीचर्स मिळणार आहेत. आता नवीन टॅबलेटच्या शानदार फिचर्सविषयी –

*OnePlus Pad Go ची किंमत

वनप्लस पॅड गो च्या वाय-फाय मॉडेलची किंमत 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटसाठी किंमत 19,999 रुपये आहे. व 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेले एलटीई मॉडेल 21,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आले आहे.

8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेले वाय-फाय मॉडेल 23,999 रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. वनप्लस पॅड गो ची प्री-ऑर्डर 12 ऑक्टोबरपासून सुरू होईल, तर सेल 20 ऑक्टोबरपासून सुरू होईल. हा टॅबलेट वनप्लस इंडियाच्या वेबसाइट, वनप्लस स्टोअर ऍप, फ्लिपकार्ट,

अमेझॉन, रिलायन्स, क्रोम आणि आघाडीच्या ऑफलाइन आउटलेट्सवर उपलब्ध असेल. तसेच टॅबलेटच्या खरेदीवर कंपनी 2,000 रुपयांचा इन्स्टंट बँक डिस्काउंट देत आहे. याशिवाय ग्राहकांना 1,399 रुपयांचे फोलिओ कव्हर एकदम फ्री मिळणार आहे. टॅबलेट ट्विन मिंट कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल.

*OnePlus Pad Go स्पेसिफिकेशन्स

वनप्लस पॅड गो मध्ये 11.35 इंचाचा डिस्प्ले आहे जो 2.4K रिझोल्यूशन देतो. डिस्प्ले पॅनेल टीयूव्ही राइनलँड सर्टिफाइड आहे आणि 400 निट्स ब्राइटनेस प्रदान करते. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्झ आणि आस्पेक्ट रेशियो 7:5 आहे. डिव्हाइसमध्ये ऑक्टा-कोर हेलियो जी 99 प्रोसेसर आहे. या टॅब्लेटमध्ये 8GB रॅम आणि 256GB इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts