OnePlus Smartphone : स्मार्टफोनची मोठी क्रेझ सध्या पाहायला मिळत आहे. OnePlus कंपनीचे स्मार्टफोन तरुणाईमध्ये जास्त लोकप्रिय आहेत. OnePlus चा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. OnePlus ने त्यांच्या एका मिड रेंज फ्लॅगशिप स्मार्टफोनवर एक जबरदस्त डिस्काउंट दिला आहे, OnePlus 10R 5G हा तो स्मार्टफोन असून Amazon वर त्यावर डिस्काउंट मिळत आहे.
सर्वप्रथम याठिकाणी आपण फोनच्या फीचर्सबद्दल पाहणार आहोत आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला त्यावर मिळणाऱ्या डिस्काऊंटबद्दल सांगणार आहोत. जेणेकरून हा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला सर्व डिटेल्स मिळतील,
OnePlus 10R 5G चे फीचर्स
– फोनमध्ये ६.७ इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे, जो १०८० बाय २४१२ पिक्सल रिझोल्यूशन देतो. प्रोटेक्शनसाठी डिस्प्लेमध्ये गोरिल्ला ग्लास ५ देण्यात आला आहे. यात ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी 8100 5G प्रोसेसर आहे.
– यात मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 50 एमपी प्रायमरी कॅमेरा, 8 एमपी कॅमेरा आणि 2 एमपी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सेल सेन्सरसह सिंगल फ्रंट कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
– हा फोन प्राईम ब्लू आणि सिएरा ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. यात ८ जीबी, १२ जीबी रॅम आणि १२८ जीबी, २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. हा फोन 5000mAh नॉन-रिमूवेबल बॅटरीसह येतो.
OnePlus 10R 5G वर डिस्काउंट
– या फोनची खरी किंमत, म्हणजेच या डिस्काउंटपूर्वी तुम्हाला ते ८ जीबी/१२८ जीबी व्हेरियंटसाठी ३४,९९९ रुपये लागत होते. जे आता सवलतीनंतर फक्त ३०,९९९ रुपये झाले आहे.
– ही खूप चांगली सूट आहे आणि अतिरिक्त सवलतींबद्दल बोलायचे झाले तर त्यासाठी अनेक पर्याय आहेत. कोटक किंवा आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून पेमेंट केल्यास तुम्हाला १००० रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळेल.
– जर तुम्ही onecard वापरत असाल तर तुम्हाला ३००० रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच तुमची एकूण किंमत २७,९९९ रुपये असेल. याव्यतिरिक्त, आपण आपला जुना फोन एक्सचेंज करू शकता आणि आणखी मोठी सूट मिळवू शकता कारण एक्सचेंज व्हॅल्यू सध्या २१,७०० रुपयांपर्यंत आहे.
– जर तुम्ही सर्व ऑफर्सचा लाभ घेतला तर तुमच्या फोनची किंमत फक्त ६००० रुपये होईल. परंतु एक्सचेंज व्हॅल्यू पूर्णपणे आपल्या जुन्या फोनच्या मॉडेलवर आणि त्याच्या स्थितीवर अवलंबून असते.