Personal Finance : सध्या महागाईने सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर त्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहे. आपलेही स्वतःचे घर असावे असे अनेकांना वाटत असते. घर विकत घेणे हा सर्वांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय असतो.
आपल्या कुटुंबासाठीची घर ही एक सर्वोत्तम गोष्ट असते. परंतु सध्या घर खरेदी करणे खूप महाग झाले आहे. अशातच जर तुम्ही नोकरीसोबत घर घेण्याच्या विचारात असाल तर एक खास फॉर्म्युला लक्षात ठेवा. तुम्हाला घर खरेदी करणे सोपे जाईल.
विशेष सूत्र
या बाबत आर्थिक तज्ञ दीप्ती भार्गव असे सांगतात की 3/20/30/40 फॉर्म्युला नोकरदार व्यक्तीकडून किंवा कोणत्याही मध्यमवर्गीय व्यक्तीकडून घर किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी अवलंबावा. त्यामुळे याद्वारे तुम्हाला तुमच्या उत्पन्नातून घर सहज सांभाळता येते आणि तुमच्या घराचे बजेट बिघडत नाही. तसेच तुम्ही स्वत:च्या फ्लॅटचे स्वप्नही पूर्ण करू शकता.
जाणून घ्या सूत्र
फॉर्म्युलानुसार 3 म्हणजे तुम्ही खरेदी करत असणाऱ्या घराची किंमत तुमच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या तिप्पट नसणे गरजेचे आहे. समजा तुमचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असल्यास तुम्हाला 30 लाख रुपयांपर्यंत घर किंवा फ्लॅट खरेदी करता येतो.
तर दुसरीकडे, जर 20 बद्दल बोलायचे झाले तर याचा अर्थ असा की कर्जाचा कालावधी आहे. इतक्या मोठ्या खर्चासाठी मध्यमवर्गीय व्यक्तीला कर्जाची गरज नक्कीच असते. या बाबत, तुमच्या कर्जाची परतफेड कालावधी 20 वर्षांपेक्षा जास्त नसावा. जर यापेक्षा कमी ठेवता आले तर चांगले.
तसेच 30 तुमच्या EMI चा संदर्भ देते. तुमचा EMI तुम्ही कमावत असणाऱ्या 30% पेक्षा जास्त नसावा. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला 80 हजार रुपये कमावत असाल, तर तुमचा EMI 24 हजारांपेक्षा जास्त नसणे गरजेचे आहे.
सर्वात शेवटी म्हणजे 40 तुमच्या डाउन पेमेंटचा संदर्भ देते. ज्यावेळी तुम्ही फ्लॅट घेता त्यावेळी तुम्हाला त्याचे डाउन पेमेंट करावे लागू शकते. त्यामुळे तुम्ही 40% पर्यंत डाउन पेमेंट करण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला कमीत कमी कर्ज घ्यावे लागेल जर तुम्ही असे केले तर तुम्ही ते छोट्या हप्त्यांमध्ये आणि कमी वेळेत परत करू शकता. उदाहरणार्थ, समजा तुमचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये इतके आहे आणि तुम्ही 30 लाख रुपयांचा फ्लॅट विकत घेतल्यास तुम्ही 12,00,000 रुपये डाउन पेमेंट करावे. उर्वरित रकमेसाठी तुम्हाला कर्ज घेता येते.