Rahu Shukra Yuti 2024 : वैदिक ज्योतिषात राहू आणि शुक्र ग्रहाला विशेष महत्व आहे. शुक्र हा राक्षसांचा गुरू आहे, तर राहू हा मायावी ग्रह आहे. जन्मकुंडलीत दोन्ही ग्रहांची जुळवाजुळव काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. सुमारे 12 वर्षांनंतर राहू आणि शुक्र मीन एकत्र येणार आहे. त्याचा शुभ प्रभाव अनेक राशींवर पडणार आहे.
या काळात काही राशींच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच भौतिक सुख-सुविधा मिळतील. तसेच अनेक लाभ मिळतील, 1 एप्रिल 2024 रोजी या दोन मोठ्या ग्रहांचा संयोग मीन राशीत होणार आहे. या संयोगाचा लाभ लोकांना पूर्ण 38 दिवस लाभ मिळेल. चला जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींना फायदा होईल…
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना या संयोगाचा फायदा होईल. प्रगतीची संधी मिळेल. भौतिक सुखसोयी वाढतील. बेरोजगारी दूर होईल. व्यवसायात लाभ होईल. करिअरसाठी हा काळ अनुकूल राहील.
कर्क
राहू आणि शुक्राचे मिलन कर्क राशीच्या लोकांसाठी देखील अनुकूल राहील. जमीन, वाहन आणि नवीन घर खरेदीची शक्यता आहे. व्यवसाय आणि करिअरमध्ये फायदा होईल. धार्मिक कार्याकडे कल वाढेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
धनु
राहू आणि शुक्राचा संयोग धनु राशीच्या लोकांसाठीही शुभ ठरेल. भौतिक सुख-सुविधांमध्ये लाभ होईल. आर्थिक लाभ आणि यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक समस्यांपासून सुटका मिळेल.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी राहू आणि शुक्राचा संयोगही फलदायी ठरेल. उत्पन्न वाढेल. पदोन्नती मिळू शकते. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. व्यावसायिकांसाठी हा काळ अनुकूल राहील. पैशांची बचत होईल.