Rajyog 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि कुंडलीला विशेष महत्व आहे. तसेच नऊ ग्रहांमध्ये शुक्र, गुरू आणि बुध यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते, जेव्हा-जेव्हा हे ग्रह आपली चाल बदलतात तेव्हा शुभ आणि अशुभ असे योग तयार होतात. दरम्यान, डिसेंबर संपण्यापूर्वी आणि नवीन वर्षाच्या सुरूवातीस, दोन मोठे राजयोग तयार होणार आहेत, जे काही राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानले जात आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार नवीन वर्षात भौतिक सुख-सुविधा, सौंदर्य आणि कीर्तीचा कारक शुक्र आणि बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती, व्यवसाय यांचा कारक असलेला बुध पुन्हा एकदा मकर राशीत संयोग घडवणार आहे, ज्यामुळे लक्ष्मी नारायण निर्माण राजयोग होईल. तर 25 डिसेंबर रोजी संपत्ती आणि समृद्धी देणारा शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे आणि भाग्य आणि ज्ञानाचा कारक बृहस्पति मेष राशीत आहे. अशा स्थितीत गुरू आणि शुक्र समोरासमोर आल्याने समसप्तक योगही तयार होत आहे. हे दोन मोठे योग काही राशींना फलदायी ठरणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी चला पाहूया…
कन्या
समसप्तक राजयोगाची निर्मिती कन्या राशीच्या लोकांसाठी खूप मानली जात आहे. या राशींसाठी 2024 पासून सुवर्णकाळ सुरू होईल. तसेच दीर्घकाळ प्रलंबित कामांना गती मिळेल. या काळात तब्येत देखील सुधारेल. बेरोजगारांना नवीन नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढल्याने नवीन स्रोत खुले होतील. नोकरी करणार्यांना आणि व्यावसायिकांसाठी काळ एकदम उत्तम राहील. नोकरीमध्ये पदोन्नती आणि पगार वाढण्याची शक्यता आहे आणि व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेची साथ मिळेल आणि यश मिळू शकेल.
मकर
समसप्तक राजयोग मकर राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यवान मानला जात आहे. नशीब तुमच्या बाजूने असेल. व्यवसायात प्रगती होण्याची देखील दाट शक्यता आहे. कामात यश मिळेल, आर्थिक स्थिती मजबूत होईल. परदेशात नोकरी करणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. समाजात मान-सन्मान वाढेल. तुमची मनोकामना पूर्ण होईल.गुरूंचे आशीर्वाद मिळतील.
धनु
बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती धनु राशीच्या लोकांसाठी भाग्यवान सिद्ध होऊ शकते. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच आर्थिक स्थिती मजबूत होईल. नशीब तुमच्या बाजूने असेल. व्यावसायिक जीवनात प्रगती कराल. समाजात तुमची प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठा वाढेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांसाठी देखील हा काळ चांगला मानला जात आहे.
मेष
गुरु आणि शुक्र समोरासमोर आल्यावर तयार होणारा समसप्तम राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी खूप खूप शुभ ठरू शकतो. या काळात नोकरी-व्यवसायात प्रगती मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्येही तुम्हाला यश मिळेल.अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. शुक्राच्या कृपेने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठीही हा काळ उत्तम राहील, या काळात चांगला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. तसेच लक्ष्मी नारायण राजयोगामुळे करिअर आणि व्यवसायात यश मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळतील. वडिलांशी संबंध सुधारतील. एकूणच हा काळ चांगला मानला जात आहे.