Rajyog 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रहांना खूप महत्वाचे स्थान आहे, सर्व ग्रहांच्या चाली वेळोवेळी बदलत राहतात, ज्याचा प्रत्त्येकाच्या जीवनावर परिणाम होतो. अशातच वैभव आणि समृद्धीचा कारक शुक्र कर्क राशीत प्रवेश करत असल्यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार झाला आहे. यामुळे काही राशींवर याचा परिणाम दिसून येणार आहेत.
असे म्हणतात की, ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र उच्च किंवा शुभ स्थानावर असतो, त्याला भौतिक सुखांचा लाभ होतो. तूळ, कर्क, कन्या आणि मकर या चार राशींसाठी राज योग भाग्यवान ठरणार आहे. तोच शुक्र 19 ऑगस्ट रोजी सकाळी 05:21 वाजता उगवणार आहे, ज्यामुळे मीन, मकर आणि कर्क राशींना फायदा होईल.
ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा राहू मेष राशीत असतो आणि गुरू एकाच वेळी मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा गजलक्ष्मी योग तयार होतो. या काळात शनीची साडेसाती संपते आणि गजलक्ष्मी योग तयार होतो. विशेष म्हणजे शुक्र हा वृषभ आणि तूळ राशीचा अधिपती ग्रह मानला जातो. शुक्राचा संक्रमण कालावधी सुमारे 23 दिवस आहे.
‘या’ राशींना मिळेल गजलक्ष्मी राजयोगाचा लाभ
तूळ
गजलक्ष्मी राजयोग या राशीच्या लोकांसाठी शुभ मनाला जात आहे. या काळात त्यांनी जी काही योजना आखली ती पूर्ण होईल. व्यापारी आणि नोकरी व्यावसायिक दोघांसाठीही हा काळ उत्तम राहील. धनलाभामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. मीडिया, मार्केटिंग, शिक्षण आणि संप्रेषणाशी संबंधित असलेल्यांसाठी हा काळ नवीन आयाम स्थापित करण्याचा असेल.
कर्क
या राशीच्या लोकांना गजलक्ष्मी राजयोग शुभ संकेत देईल. या काळात उत्पन्नाचे स्त्रोत वाढण्याची देखील शक्यता आहे. या दिवसांत पैसा येण्याचे देखील नवीन मार्ग खुले होतील. तुम्हाला प्रेमप्रकरणात यश मिळू शकते. तसेज तुमच्या कामात यश मिळेल. या राशीचे लोक पैशाच्या बाबतीत खूप भाग्यवान असतील. या काळात ते पैशाची बचत करण्यात यशस्वी होतील. जोडीदारासोबत सुरू असलेल्या अडचणी दूर होतील. गुंतवणुकीत नफा मिळेल. तसेच कामाच्या नव्या संधी प्राप्त होतील.
कन्या
या राशीच्या लोकांना गजलक्ष्मी राजयोग फलदायी ठरणार आहे. या काळात कामात यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होईल आणि जोडीदारासोबत चांगला ताळमेळ राहिल्याने वैवाहिक जीवन आनंदी राहील. व्यावसायिकांसाठी काळ उत्तम असेल, व्यवसायात लाभ होईल. गुंतवणुकीचे नवे मार्ग खुले होतील आणि तुम्हाला नफा मिळेल.
मकर
गजलक्ष्मी राजयोग शुभ असेल. नवीन नोकरीचा शोध पूर्ण होईल, तसेच नोकरीच्या चांगल्या संधी देखील मिळतील. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. मोठ्या अधिकाऱ्यांसोबत भेट होण्याची शक्यता आहे.व्यवसायासाठी हा काळ उत्तम असेल, भागीदारीत काम करत असाल तर लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात एखादी नवीन आणि चांगली डील फायनल होऊ शकते.
शुक्राच्या संक्रमनामुळे ‘या’ राशीच्या लोकांना फायदा होईल
मिथुन
शुक्राच्या संक्रमनामुळे या लोकांना लाभ होईल. १९ ऑगस्टपासून या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल, देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होईल. धनलाभाची शक्यता आहे. कामात यश मिळेल तसेच आर्थिक स्थिती मजबूत असेल. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. कौटुंबिक सहकार्य मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्वाने आजूबाजूचे लोक प्रभावित होतील. कामातील अनेक अडथळे दूर होतील.
धनु
या काळात या राशीच्या लोकांना चांगल्या बातम्या मिळतील, तसेच उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे, नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळतील. लव्ह लाईफमध्ये यश मिळवू शकाल. दीर्घ काळापासून सुरू असलेल्या समस्यांमधून बाहेर पडाल. प्रतिस्पर्ध्यांपेक्षा चांगली कामगिरी कराल. सासरच्या मंडळींकडून काही चांगली बातमी कळू शकते.
तूळ
या राशीच्या लोकांसाठी हा काळ फलदायी असेल, अचानक धनलाभ होण्याची शक्यत असेल, या काळात नवीन डील फायनल करू शकाल. उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील. व्यवसायासाठी वेळ उत्तम आहे, कोणतीही नवीन योजना तुम्हाला खूप चांगले परिणाम देऊ शकते. वैयक्तिक संबंधांमध्ये सुसंगतता देखील दिसून येईल. तुमच्या कामात येणारे अडथळे हळूहळू दूर होतील. दूरच्या सहलींचे बेत आखू शकता, या काळात नोकरी बदलू शकता.
मीन
मिन राशींसाठी देखील हा काळ फायदेशीर ठरू शकतो. सर्व भौतिक सुखे मिळू शकतात. वाहन किंवा नवीन मालमत्ता घ्यायची असेल तर वेळ चांगला आहे. ही गुंतवणूक तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. दुसरीकडे, जमीन आणि मालमत्तेच्या बाबतीत, तुम्हाला कुटुंब आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून फायदा होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टी आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी काळ उत्तम राहील.