Rajyog 2024 : ज्योतिषशास्त्रातील सर्व नऊ ग्रहांपैकी शनिची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शनीला न्यायाचा देवता म्हणून ओळखले जाते. असे म्हणतात की, शनि दयाळू झाला तर जमिनीवर बसलेला माणूस सिंहासनावर बसू शकतो, आणि जर शनीची साडे साती लागली तर सिंहासनावर बसलेला माणूस येऊ शकतो.
दरम्यान, सध्या शनिदेव स्वतःच्या मूळ राशीत कुंभ राशीत स्थित आहेत. आणि 2024 मध्ये शनिदेव आपल्या मूलत्रकोण राशीत कुंभ राशीत भ्रमण करतील, ज्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होईल, जो 3 राशीच्या लोकांना विशेष लाभ देईल.
केंद्र त्रिकोण राजयोग ‘या’ राशींसाठी लाभदायक !
सिंह
सिंह राशीच्या लोकांना 2024 मध्ये शनीचा पूर्ण आशीर्वाद मिळेल. तसेच केंद्र त्रिकोण राजयोग उत्तम असेल. या काळात उत्पन्न वाढेल, नवीन स्रोत उघडतील. करिअरसाठी काळ सोनेरी असेल, तसेच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. धार्मिक कार्यात देखील रुची वाढेल. ज्यामुळे मन शांत राहील. भागीदारीत काम करणाऱ्यांना या काळात चांगला नफा मिळू शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील. नोकरदारांनाही बढती मिळण्याची शक्यता आहे. नशीब तुमच्या बाजूने असेल. सर्व बिघडलेली कामे पूर्ण होतील. अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
कुंभ
कुंभ राशीत शनीची उपस्थिती असल्यामुळे या राशीच्या लोकांवर विशेष आशीर्वाद राहील. केंद्र त्रिकोण राजयोग देखील खूप शुभ सिद्ध होईल. या काळात आत्मविश्वास वाढेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. विवाहितांसाठी काळ चांगला राहील. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. समाजात मान-सन्मान वाढेल. कर्मचाऱ्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळेल, त्याच्या कामाचे कौतुक होण्याबरोबरच त्याला बढती मिळू शकते. तसेच या काळात काही नोकरीच्या नवीन संधी देखील येऊ शकतात.
मिथुन
केंद्र त्रिकोण राजयोगाची निर्मिती मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. या काळात व्यवसायात वाढ होईल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीसह अनेक नवीन संधी मिळू शकतात. उत्पन्न वाढेल आणि नवीन मार्गही तयार होतील. विवाहित व्यक्तीला त्याच्या आई-वडिलांच्या घरातून तसेच सासरच्या घरातून खूप प्रेम आणि आदर मिळेल. तरुणांना कामात सकारात्मक परिणाम मिळतील. दीर्घ काळापासून प्रलंबित असलेले पैसेही वसूल होऊ शकतात. या काळात गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. तसेच शनीच्या कृपेने पुढील वर्षी तुमचे नशीब उजळेल.