Rajyog 2023 : हिंदू धर्मात कुंडली आणि ग्रहांना खूप महत्व दिले जाते. ग्रहांच्या हालचालींचा माणसाच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांपैकी गुरूला सर्वात मोठे महत्त्व मानले जाते. गुरु हा ज्ञान, बुद्धी, अध्यात्म, शिक्षण, संपत्ती आणि धर्माचा कारक मानला जातो. तो धनु आणि मीन राशीचा स्वामी आहे.
गुरू ग्रहाला एका राशीतून दुसर्या राशीत जाण्यासाठी सुमारे 13 महिने लागतात. आणि सध्या गुरू मेष राशीमध्ये वक्री अवस्थेत आहे. 31 डिसेंबर रोजी थेट मार्गी होणार आहे, अशा स्थितीत 2 शुभ राजयोग तयार होतील. 1 मे 2024 रोजी दुपारी गुरू मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करेल. 3 मे 2024 च्या रात्री देव गुरु बृहस्पति देखील अस्त अवस्थेत प्रवेश करेल.
ज्योतिष शास्त्रानुसार गुरु प्रत्यक्ष असल्यामुळे गजलक्ष्मी राजयोग आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होईल. गजलक्ष्मीच्या प्रभावामुळे घरात सुख, शांती, समृद्धी, वैभव इत्यादींचा वास होतो. ज्या राशीत गजलक्ष्मी योग तयार होतो, त्या राशींच्या मागची साडेसाती संपते आणि चांगला काळ सुरु होतो. केंद्र त्रिकोण राजयोग ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो. जेव्हा कुंडलीत 3, 4, 7 आणि 1, 5, 9 सारखे 3 केंद्र भाव आणि 10 त्रिकोण भव एकमेकांशी जुळतात तेव्हा केंद्र त्रिकोण राजयोग तयार होतो. या काळात पैशांशी संबंधित सर्व अडचणी संपतात आणि सुख समृद्धी येते. चला ग्रहांच्या या हालचालींचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे जाणून घेऊया.
कर्क
गुरू मार्गी असल्याने, गजलक्ष्मी राजयोग तयार होईल जो या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ मानला जात आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ उत्तम असेल, या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो. गुंतवणुकीतून नफा मिळण्याचीही शक्यता आहे. नोकरदार व्यक्तीला बढती आणि बदलीचे फायदे देऊ शकतात. केंद्र त्रिकोण राजयोगामुळे काम आणि व्यवसायात यश आणि चांगला नफा मिळू शकतो. एकूण हा काळ चांगला मानला जात आहे.
सिंह
गजलक्ष्मी राजयोग तयार झाल्यामुळे सिंह राशीचे राशीचे लोक भाग्यशाली होऊ शकतात. या काळात धार्मिक कार्यात रुची वाढेल. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. विचारवंत, कथा सांगणारे, ज्योतिषी किंवा अध्यात्माशी संबंधित लोकांसाठी ते अद्भूत ठरू शकते. त्रिकोण राजयोगाच्या निर्मितीमुळे 2024 पासून सुवर्णकाळ सुरू होईल. जो खूप फायदेशीर असेल, या काळात आर्थिक अडचणीतून मार्ग निघेल, तसेच चांगले परिणाम जाणवतील.
मेष
गुरू मार्गी असल्यामुळे गजलक्ष्मी राजयोगाची निर्मिती मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात नोकरी किंवा लग्नाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. वाहन आणि मालमत्ता खरेदीचा योग आहे. भौतिक सुख, व्यवसायात वाढ आणि वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना चांगल्या ऑफर मिळू शकतात. 2024 मध्ये वृषभ राशीत गुरुचे संक्रमण तुमचे नशीब मजबूत करेल. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात, गुंतवणुकीतून फायदा होईल. 2024 मध्ये काहीतरी चांगली ऐकायला मिळेल.
धनु
गजलक्ष्मी राजयोग या काळात लाभदायक ठरू शकतो. तुमच्या मुलाच्या लग्नाशी काही चांगली बातमी मिळू शकते. वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. व्यवसायात वाढ आणि नोकरीत बढतीसह नवीन ऑफर मिळू शकतात. 2024 पासून सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. करिअरमध्ये यश आणि चांगले आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.