सध्या बऱ्याच वस्तूमध्ये भेसळ करत असल्याचे प्रकरणे समोर आलेले आहेत. साधारणपणे दुधातील भेसळ ही आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्यासोबतच तूप, इतर दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल आणि इतर अनेक खाद्यपदार्थांमध्ये देखील भेसळ केली जाते.
या भेसळीचे स्वरूप पाहिले तर सहजासहजी आपल्याला भेसळ केलेले पदार्थ ओळखता येत नाहीत. अशा पदार्थांचे सेवन केल्यामुळे निश्चितच त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे आपल्याला असे भेसळ केलेले पदार्थ ओळखता येणे खूप गरजेचे आहे.
आता यामध्ये तुपाचा विचार केला तर नुकताच नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भिवंडी येथे जनावरांच्या चरबी पासून नकली तूप बनवण्याचा कारखाना त्या ठिकाणच्या महापालिका प्रशासनाने छापा टाकून उद्ध्वस्त केला.
म्हणजेच यावरून आपल्याला दिसून येऊ शकते की आपण जे तूप खातो हे शुद्ध असेलच याची आपल्याला कुठल्याही प्रकारची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे नकली तूप किंवा बनावट तूप ओळखता येणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे या लेखात आपण नकली तूप कसे ओळखावे? याबद्दलची माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत.
या पद्धतीने ओळखा नकली तूप
जर तुम्हाला शुद्ध देसी तूप ओळखायचे असेल किंवा तपासायचे असेल तर एकदम सोपा मार्ग म्हणजे हातावर घेऊन तुपाची तपासणी करणे. यामध्ये तुम्हाला तुमच्या तळ हातावर एक चमचा तूप घ्यावे लागेल व ते वितळेपर्यंत काही वेळ तुम्हाला थांबावे लागेल. अशाप्रकारे हातावर घेतलेले तूप जर वितळायला लागले तर ते तूप शुद्ध आहे असे समजावे.
परंतु जर ते तूप वितळले नाही तर मात्र ते भेसळयुक्त आहे असे ओळखावे. त्यातील दुसरी पद्धत म्हणजे गॅसवर तव्यामध्ये एक चमचा तूप गरम केल्यावर जर तूप लगेच वितळले आणि गडद तपकीरी रंगाचे झाले तर ते तूप शुद्ध आहे असे समजावे. परंतु तव्यावर जर ते तूप वितळायला वेळ लागला आणि त्याचा रंग फिकट पिवळा झाला तर ते भेसळयुक्त आहे असे समजावे.
त्यातल्या त्यात आता अशा तुपामुळे आरोग्याचे प्रश्न समोर उभे टाकले आहेत. भिवंडी मध्ये जनावरांच्या चरबी पासून तूप बनवण्याचा कारखाना उध्वस्त झाला व असे चरबीयुक्त तूप सेवन केले तर शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे साध्या पद्धती वापरून तुम्ही तूप शुद्ध आहे की बनावट हे ओळखू शकतात.
नकली तूप बनवण्याची पद्धत
समजा एक किलो नकली तूप बनवायचे असेल तर त्याकरिता 500 ग्रॅम जनावरांची चरबी, तीनशे ग्रॅम रिफाइंड ऑइल आणि 200 ग्रॅम शुद्ध तूप आधी एकत्र केले जाते व कढईत गरम करण्यात येते. दुकानावर त्यानंतर त्या तुपात शुद्ध तुपासारखे सुगंध देणारे काही केमिकल मिसळून डब्यामध्ये त्याची पॅकिंग केली जाते व हे डबे विक्रीसाठी पाठवले जातात.
अशी माहिती अन्न व औषध विभागाच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे जर तुम्हाला असे भेसळयुक्त पदार्थ विक्री होत असल्याची माहिती मिळाली तर तुम्ही याची तक्रार औषध प्रशासन विभागाकडे किंवा स्थानिक महापालिका प्रशासनाकडे करू शकतात.