अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- २०२१ हे वर्ष भारतीय अब्जाधीशांसाठी चांगले गेले आहे. यादरम्यान गौतम अदानी यांनी वेगाने विक्रमी कमाई करत त्यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना मागे टाकलं आहे.भारतीय अब्जाधीशांमध्ये, गौतम अदानी यांनी२०२१ मध्ये सर्वाधिक $ ४१. ५ अब्ज कमावलेत.
अदानी अंबानींच्या अगदी जवळ पोहोचले होते
ब्लूमबर्गच्या बिलियनेअर इंडेक्सनुसार, अदानीची एकूण संपत्ती सध्या $75.3 अब्ज आहे. ते मागील वर्षाच्या तुलनेत $41.5 अब्ज अधिक आहे. म्हणजेच २०२१ मध्ये अदानीची संपत्ती दुपटीहून अधिक झाली आहे.
एक काळ असा होता की,अदानी यांची एकूण संपत्ती ८५ अब्ज डॉलरच्या पुढे गेली होती. मात्र, त्यानंतर अदानी समूहाच्या काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने त्यांची नेटवर्थ थोडी कमी झाली होती.
विप्रोचे अझीम प्रेमजी २०२१ मध्ये कमाईतही अंबानींच्या पुढे…
निर्देशांकानुसार, केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्याकडे सध्या 89.7 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे $ १३ अब्ज अधिक आहे.
२०२१ मध्ये कमाईच्या बाबतीत विप्रोचे अझीम प्रेमजी यांनी अंबानींना मागे टाकलय. २०२१ च्या अखेरीस प्रेमजींची एकूण संपत्ती $४१.२बिलियन होती, जी मागील वर्षाच्या तुलनेत $१५.८ बिलियनने वाढली आहे.
दमाणी आणि नाडर यांनी सुमारे 10 अब्ज डॉलर्सची भर घातली
डीमार्टच्या राधाकिशन दमानी यांच्यासाठीही हे वर्ष चांगले ठरल आहे. यावेळी दमानी यांची संपत्ती $9.51 बिलियनने वाढून $24.4 बिलियन झाली.
2021 मध्ये, HCL चे शिव नाडर सर्वाधिक कमाईच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर होते. गेल्या वर्षी त्यांची संपत्ती ८.४० अब्ज डॉलरने वाढून ३२.५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
‘या’ अब्जाधीशांसाठी २०२१ हे वर्ष पर्वणी ठरले
२०२१ हे वर्ष इतर अनेक अब्जाधीशांसाठीही चांगले ठरले. यापैकी सावित्री जिंदाल यांच्या संपत्तीत $५.८२ अब्ज आणि कुमार मंगलम बिर्ला यांच्या संपत्तीत $५ .०२ बिलियनची वाढ झाली आहे.
याशिवाय सन फार्माचे दिलीप संघवी यांची एकूण संपत्ती ४.२८ अब्ज डॉलर, डीएलएफचे केपी सिंग यांची ३.६१ अब्ज डॉलर आणि नायकाच्या फाल्गुनी नायर यांची संपत्ती ३ अब्ज डॉलरने वाढलीय.