Zika Virus : पुणे शहरासह महारष्ट्रामध्ये झिका व्हायरसचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. झिका व्हायरसचा संसर्ग हा डासांपासून होत असून पुणेकरांसह सर्वाना काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच गर्भवती महिलांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
पुण्यासह महाराष्ट्रातील काही भागात झिका विषाणूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच ही परिस्थिती गर्भवती महिलांसाठी चांगली नाही. वेळोवेळी त्यांची तपासणी करणे फार महत्वाचे आहे. जरी एखाद्या महिलेला या आजाराची लागण झाली असली तरी तिच्या गर्भाच्या विकासावर लक्ष ठेवले पाहिजे.
झिका व्हायरस हा आफ्रिका, अमेरिका आणि दक्षिण भारतात आढळतो. मात्र, हा व्हायरस भारतामध्ये कसा आला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. कारण झिका संसर्ग झालेल्या पुण्यातील कोणत्याही रुग्णाने अफ्रिका, अमेरिका किंवा दक्षिण भारतामध्ये प्रवास केलेला नाही. भारतामध्ये आणि पुण्यातच झिका कुठून आला? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
झिका व्हायरस कशामुळे होतो?
तुमच्या माहितीसाठी झिका विषाणूचा संसर्ग एडिस डासाच्या चावण्याने पसरतो. एवढेच नाही तर त्यामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियाची लागण होते.
झिका व्हायरसची लक्षणे?
साधारणपणे, झिका विषाणूची लागण झालेल्या 80 टक्के लोकांमध्ये कोणताही संसर्ग दिसून येत नाही, परंतु जर एखाद्याला ताप, पुरळ, सांधे आणि स्नायू दुखणे, डोकेदुखी अशी लक्षणे दिसून आली तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. ही लक्षणे संक्रमित डास चावल्यानंतर एक आठवड्यानंतर दिसतात.