Roasted Chana And Jaggery Benefits : हजारो वर्षांपासून लोक भाजलेले हरभरे खात आहते. भाजलेले आपल्या हरभरे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. यात मुबलक प्रमाणात पोषक तत्व आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये प्रोटीन, फोलेट, फायबर, अँटीऑक्सिडंट्स यांसारखे अनेक पोषक घटक देखील आढळतात. भाजलेल्या हरभऱ्याचे सेवन कोणत्याही ऋतू मध्ये केले जाऊ शकते. पण हिवाळ्यात त्याचे सेवन केल्याने त्याचे अधिक फायदे मिळतात.
हिवाळ्यात गुळासोबत हरभरा खाल्ल्यास ते आरोग्यासाठी चमत्कारिक ठरते, याच्या सेवनाने शरीराला लगेच ताकत मिळते. आजही जीममध्ये व्यायाम करणाऱ्या लोकांना भाजलेले हरभरे खाण्याचा सल्ला दिला जातो. हे प्रोटीन पावडरपेक्षा 10 पट अधिक फायदेशीर आणि प्रभावी आहे. आजच्या या लेखात आपण गुळासोबत भाजलेले हरभरे खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत, चला तर मग…
हरभरा आणि गूळ एकत्र भाजून खाण्याचे फायदे :-
-हिवाळ्यात तुम्ही भाजलेले हरभरे आणि गूळ एकत्र खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती वेगाने वाढण्यास मदत होते. याच्या सेवनाने शरीरात त्वरित ऊर्जा वाढते. याचे जास्त दिवस सेवन केल्यास शरीर मजबूत होण्यास मदत होते. वास्तविक, यामध्ये फॉस्फरस आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक आढळतात जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. हे संक्रमण आणि रोगांपासून संरक्षण करण्यास देखील मदत करते. याच्या सेवनानेआपण मोसमी आजारांपासून लांब राहतो.
-भाजलेले हरभरे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत करते. हे शरीरातील विषारी घटक काढून शरीराला डिटॉक्स करते. याचे सेवन केल्याने व्यक्ती निरोगी, प्रसन्न आणि तंदुरुस्त राहते. रक्ताची गुणवत्ता वाढवण्यासाठीही हे फायदेशीर ठरतात.
-भाजलेले हरभरे आणि गूळ यांचे नियमित सेवन केल्यास डोळ्यांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळतात, जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात. इतकेच नाही तर त्यात मॅंगनीज, कॅल्शियम आणि फॉस्फरस देखील असतात.
-याशिवाय भाजलेल्या हरभऱ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी6, फोलेट आणि कॉपर यांसारखी खनिजे आणि जीवनसत्त्वे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. याशिवाय, ते रक्तदाब पातळी राखण्यास देखील मदत करतात. यासोबतच ते हृदयविकारांनाही दूर ठेवतात आणि आरोग्यासाठी रामबाण उपाय ठरतात. भाजलेले हरभरे शरीरात ग्लुकोज वाढू देत नाही. तसेच चयापचय प्रक्रिया गतिमान करते.