Shani Dev : शनिदेवाला कर्माचा देवता म्हणतात. शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. जे चांगले कर्म करतात त्यांना शुभ फळ प्राप्त होते. तर, वाईट कृत्य करणाऱ्याला शिक्षादेखील होते.
आपल्या सर्वांना माहित आहे की सर्व ग्रह त्यांच्या निश्चित वेळेच्या अंतराने त्यांच्या राशी बदलतात. पण नऊ ग्रहांमध्ये शनी देव हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो ज्याने अलीकडेच कुंभ राशीत प्रवेश केला आहे.
सध्या शनी कुंभ राशीत असून विशेष हालचाल करणार आहे, शनिदेव कुंभ राशीत अस्त होणार आहे. यानंतर तो २६ मार्चला पुन्हा उदित होणार आहे. अशास्थितीत काही राशींना याचा खूप फायदा होणार आहे, कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी चला पाहूया…
सिंह
11 फेब्रुवारीला शनिदेव 7 व्या घरात अस्त अवस्थेत राहणार आहे, ज्यामुळे सिंह राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकता. यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ खूप महत्त्वाचा मानली जात आहे. जर तुम्ही परदेशात जाऊन शिकण्यासाठी किंवा नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमचे ते स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या काळात मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे घरात आनंद येईल. शुभ कार्यक्रमाचे आयोजन करता येईल.
मिथुन
शनिदेव मिथुन राशीच्या 9व्या घरात अस्त अवस्थेत असणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांवर देवाची विशेष कृपा राहील. तुम्हाला खूप शुभेच्छा मिळतील. खूप दिवसांपासून कुठेतरी अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्याने तुम्ही कोणतेही काम यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूप शुभ मानला जातो आहे पण तसे करण्यापूर्वी तुम्ही एखाद्या तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी शनिदेव आठव्या भावात अस्त राहणार आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला ती लवकरच मिळू शकेल. सर्वजण तुमच्या कार्याची प्रशंसा करतील, ज्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबासोबत बराच वेळ घालवू शकाल. यामुळे तुमची मानसिक स्थिती सुधारेल आणि कामाचा ताण दूर होईल.