लाईफस्टाईल

Shani Dev : ‘या’ 3 राशींवर असेल शनीची विशेष कृपा; उघडेल नशिबाचे दार…

Shani Dev : सर्व ग्रहांमध्ये शनी देवाला महत्वाचे स्थान आहे. कारण शनी जेव्हा आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा इतर राशींवर परिणाम दिसून येतो. शनी हा सर्वात संथ गतीचा ग्रह आहे. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करायला सुमारे अडीच वर्षे लागतात, त्यामुळे शनीला पुन्हा त्याच राशीत जाण्यासाठी 30 वर्षे लागतात.

2023 मध्ये, शनि 30 वर्षांनंतर त्याच्या मूळ राशीत म्हणजेच कुंभ राशीत आहे, जो 2025 पर्यंत तिथेच राहील, त्यानंतर तो जूनमध्ये मीन राशीत प्रवेश करेल. दरम्यान, नवीन वर्षाच्या आधी म्हणजे 4 नोव्हेंबरला शनी मार्गी अवस्थेत आहे, जो 3 राशींसाठी फायदेशीर मानला जात आहे. शनिची मार्गी असल्यावर तो सरळ चालू लागतो, त्यामुळे नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक स्थितीत फायदा होतो. या काळात कोणत्या तीन राशींना फायदा होणार आहे, पाहूया…

मेष

शनीची सरळ चाल मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात विशेष लाभ होतील, तसेच उत्पन्न वाढू शकते आणि नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. करिअर आणि व्यवसायासाठी काळ उत्तम राहील. यावेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात नशीबही चांगली साथ देईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. बेरोजगारांना या काळात नोकरी मिळू शकते.

मिथुन

मिथुन राशीवर देखील शनीच्या या चालीचा प्रभाव असणार आहे. या काळात कायदेशीर वादात यश मिळू शकते. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. अडकलेले व रखडलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायात नफा, नवीन संधी, नोकरीत बढती व यश मिळू शकते. या काळात काही चांगली बातमी मिळू शकते. समाजात तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल. प्रवासाचेही योग येतील. देशात किंवा परदेशात सहलीला जाऊ शकता. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना काही परीक्षेत यश मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारू शकते. एकूणच हा काळ उत्तम मानला जात आहे.

मकर

शनिच्या या हालचालीमुळे मकर राशीच्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. या काळात अनपेक्षित आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. तसेच वडिलोपार्जित मालमत्तेतही वाढ होऊ शकते. नोकरदारांसाठी काळ एकदम उत्तम राहील. नवीन नोकरी आणि बढतीचे संकेत आहेत. करिअरच्या नवीन संधी मिळू शकतात, कामात यश मिळेल. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. या काळात नशिबाची साथ मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts