Shani Gochar 2024 : जोतिषात नऊ ग्रहांपैकी शनिदेवाला विशेष महत्व आहे. शनिदेवाला सर्वात क्रूर देवांपैकी एक मानले जाते. शनिदेवाची वाईट नजर टाळण्यासाठी भाविक दर शनिवारी त्यांची विधीपूर्वक पूजा करतात. हिंदू मान्यतेनुसार, शनिदेवाला न्याय देवता देखील मानले जाते, ज्यांना धर्म, न्याय आणि कर्माचे प्रतीक देखील मानले जाते. तो व्यक्तीला त्याच्या चांगल्या-वाईट कर्मानुसार फळ देतो.
सध्या, शनी स्वतःच्या कुंभ राशीत आहेत. जिथे शनी अडीच वर्षांसाठी संक्रमण करेल. ज्याचा सर्व 12 राशीच्या लोकांवर प्रभाव येणार आहे. तर या काळात 3 राशीच्या लोकांना खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या काळात शनीचे कुंभ राशीतील संक्रमण या तीन राशींसाठी खूप घातक ठरणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी चला पाहूया…
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप अशुभ मानला जात आहे. या काळात सिंह राशीच्या लोकांना घरगुती, आर्थिक आणि व्यावसायिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे मानसिक ताण वाढेल. याचा तुमच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. ऑफिसमध्ये किंवा मित्रांमध्ये विनाकारण वाद होऊ शकतात. या काळात वाहन चालवताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप त्रासदायक असणार आहे कारण शनिदेवाची दृष्टी तुमच्यासाठी आव्हान निर्माण करू शकते. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात अपयशाला सामोरे जावे लागू शकते. तसेच आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबात वाद वाढतील, त्यामुळे मन अस्वस्थ राहील. लोकांशी मतभेदही होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल कारण त्यामुळे तुमचे नातेसंबंध बिघडेल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ काही चांगला मानला जात नाही. या काळात नोकरी शोधणारे तरुण आणि मेहनती विद्यार्थ्यांना अपयशाचा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर वैवाहिक जीवनातही अंतर निर्माण होऊ शकते. तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडूनही अडचणी येऊ शकतात. तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटणार नाही, ज्यामुळे तुमचे पूर्ण झालेले कामही बिघडू शकते. मुलांकडून काही अशुभ बातमी मिळू शकते, त्यामुळे मन उदास राहील.