लाईफस्टाईल

Shani Vakri 2023 : ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु ! कामत यश, व्यवसायात प्रगती, धनलाभाचे संकेत…

Shani Vakri 2023 : ग्रह-ताऱ्यांच्या हालचालींना ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह एक राशी सोडून एका विशिष्ट वेळी दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तेव्हा त्याचा इतर राशींवर शुभ आणि अशुभ असा परिणाम दिसून येतो. दरम्यान, शनि ग्रह दर अडीच वर्षांनी आपली राशी बदलतो, त्यामुळे शनीला पुन्हा त्याच राशीत परत येण्यासाठी 30 वर्षे लागतात. सन 2023 मध्ये, शनीने 30 वर्षांनंतर त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत प्रवेश केला आहे. सध्या शनिदेव कुंभ राशीत प्रतिगामी अवस्थेत विराजमान आहेत, त्यामुळे त्रिकोण राजयोग तयार झाला आहे, या योगाचा लाभ 2025 पर्यंत 3 राशींना मिळणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी चला जाणून घेऊया.

सिंह

प्रतिगामी शनि या राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी ठरणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ उत्तम राहील. तसेच अचानक धनलाभाचे देखील योग आहेत, व्यवसायात मोठा नफा होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. मुलाच्या बाजूनेही तुम्हाला काही आनंद मिळू शकेल. या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच अचानक आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. या काळात जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. भाग्यवृद्धीसोबतच नोकरी आणि व्यवसायातही प्रगती होईल.

तूळ

कुंभ राशीत शनीचे संक्रमण खूप फायदेशीर मानले जात आहे. या काळात मुलांकडून चांगली बातमी मुळण्याची शक्यता आहे. मुलाचे करिअर आणि आर्थिक बाबी शुभ राहतील. शनिदेवाची विशेष कृपा या राशीच्या लोकांवर राहील. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी 2025 पर्यंत अनेक चांगल्या संधी मिळतील. रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. नोकरीच्या अनेक ऑफर येतील. व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन कार किंवा घर खरेदी करू शकता. अचानक तुम्हाला कुठूनतरी पैसे मिळताना दिसत आहे.

धनु

या राशींसाठी देखील या योग्य शुभ मानला जात आहे. अनेक क्षेत्रांत अनपेक्षित परिणाम दिसू शकतात. तुम्हाला कामात यश मिळेल आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना हा काळ उत्तम आहे. या काळात बाहेर फिरायला जाण्याचा योग आहे.

वृश्चिक

शनीची प्रतिगामी या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली सिद्ध होऊ शकते. नोकरी व्यवसायासाठी हा काळ उत्तम मानला जात आहे. पदोन्नती व उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. या काळात आर्थिक स्थिती सुधारेल, तसेच आरोग्य चांगले राहील. कामात यश मिळू शकते. विवाहितांनी थोडे सावध राहण्याची गरज आहे, वाद होण्याच्या शक्यता निर्माण होऊ शकतात.

शत्रुहंत योग ‘या’ राशींसाठी फायदेशीर

दरम्यान, सध्या ग्रहांचा सेनापती आणि भूमीचा पुत्र मंगळ ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केला आहे, अशा स्थितीत शत्रुहंत योग तयार झाला आहे, ज्याचा प्रभाव 18 सप्टेंबरपर्यंत राहील. अशा स्थितीत अनेक राशींना विशेष लाभ मिळू शकतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शत्रुहंत योग दोन शब्दांनी बनलेला आहे, ज्याचा अर्थ शत्रूंचा नाश करणारा आहे. जेव्हा या घरात मंगळ किंवा शनिची स्थिती किंवा पक्ष असेल तेव्हा हा योग तयार होतो.

मेष

शत्रुहंत योग राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. कायदेशीर बाबींतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीतही यश मिळू शकते. समाजात मान-सन्मानही वाढेल. कामात यश मिळेल. उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे.

तूळ

शत्रुहंता योगाने लोकांना खूप फायदा होईल. प्रत्येक आव्हानावर मात करण्याचे धैर्य मिळेल. नोकरदारांसाठी हा काळ चांगला मानला जात आहे. पदोन्नती आणि प्रगतीची दाट शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात आत्मविश्वास वाढेल आणि शत्रूंचा पराभव करण्यात यशस्वी व्हाल.

कर्क

शत्रुहंत योग या राशीच्या लोकांसाठी खूप चांगला सिद्ध होऊ शकतो. यावेळी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. या काळात आत्मविश्वास वाढेल आणि अडचणी दूर होतील. नोकरदार लोकांना आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.

Renuka Pawar

Recent Posts