लाईफस्टाईल

Shani Nakshtra Gochar : होळीनंतर शनि बदलेल आपली चाल, ‘या’ राशींवर दिसून येईल सर्वाधिक परिणाम!

Shani Nakshtra Gochar : वैदिक शास्त्रात शनि हा न्याय, आरोग्य आणि जीवनाचा कारक मानला जातो. कुंडलीत शनीची मजबूत स्थिती असल्याने व्यक्तीला यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसायात नफा आहे. नशीब तुमच्या पाठीशी आहे. शनिदेव माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात.

दरम्यान, होळीनंतर एप्रिल महिन्यात शनि नक्षत्र परिवर्तन करणार आहे. भाद्रपद नक्षत्रात संक्रमण करून शनिदेव अनेक राशींचे भाग्य उजळवणार आहे. आज याच राशींबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

मेष

भाद्रपद नक्षत्रात शनीचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. व्यक्तीच्या कुंडलीच्या 11व्या घरात शनिदेव भ्रमण करतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. गुंतवणुकीत फायदा होईल. उत्पन्न वाढेल.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचा नक्षत्र बदल उत्तम राहील. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. पद, प्रतिष्ठा आणि मान-सन्मानात वाढ होईल. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. भौतिक सुखसोयी वाढतील.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांवरही शनिदेवाची विशेष कृपा असेल. व्यावसायिकांसाठी काळ अतिशय शुभ राहील. नोकरीचा शोध पूर्ण होईल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts