Side Effects Of Cumin Seeds : भारतातील प्रत्येक स्वयंपाकघरात सहज आढळणारा मसाला म्हणजे जिरे. अन्नाची चव वाढवण्यासाठी प्रत्येक भाजीत जिऱ्याचा वापर केला जातो. जिऱ्यामुळे भाजीला एक वेगळी चव येते. जिरे आणि मोहरी यांचा वापर अन्नात एकत्र केला जातो. या दोन गोष्टींशिवाय संपूर्ण पाककृती अपूर्ण मानली जाते. जिऱ्याला भारतीय स्वयंपाकघराचे प्राण मानले जाते.
डाळ, भाजी किंवा कोणताही पदार्थ बनवायचा असेल, जिऱ्याचा वापर केला जातो. इतकेच नाही तर मसालेदार पदार्थांमध्येही जिऱ्याचा वापर केला जातो. जिऱ्याशिवाय जेवणाची चव अपूर्ण मानली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? याच्या अतिसेवनामुळे आरोग्याला किती हानी पोहोचते. होय, कदाचित तुम्हाला माहीत नसेल पण हे सत्य आहे. आज आम्ही तुम्हाला जिरे खाल्ल्याने आरोग्याला होणार्या हानीबद्दलच सांगणार आहोत.
जिऱ्याचा जास्त वापर केल्याने होणारे दुष्परिणाम :-
जिरे खाल्ल्यानंतर छातीत जळजळ, ढेकर येणे, रक्तातील साखरेची पातळी कमी होणे आणि जास्त मासिक पाळी येणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात. जिरे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जात असले तरी काही कारणांमुळे ते खूप हानिकारक ठरू शकते. असे म्हटले जाते की, जर जिरे जास्त प्रमाणात सेवन केले तर तुम्ही गर्भवती असाल तर तुम्हाला गर्भपाताशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे गरोदर महिलांनी याचे अतिसेवन टाळावे.
मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी लोकांनी जिऱ्याचा जास्त वापर करू नये. खरं तर, यामुळे रक्त गोठणे यांसारख्या समस्यांना होतात. याशिवाय महिलांनी मासिक पाळीच्या काळात याचे सेवन करू नये. कारण त्यामुळे जास्त रक्तस्त्राव जास्त होऊ शकतो किंवा त्वचेवर पुरळ उठू शकते. ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो.
सामान्य व्यक्तींना कोणत्या समस्यांचा समना करावा लागू शकतो?
-यामुळे छातीत जळजळ होण्यासारख्या समस्या जाणवू शकतात.
-यकृत-मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता असते.
-याचे जास्त सेवन केल्याने शरीराला खाज सुटणे यांसारख्या समस्या जाणवतात.
-यामुळे शरीरातील साखरेची पातळी कमी होते.
-गंभीर समस्या म्हणजे मेंदूला सूज येऊ शकते.
-पाळीच्या दिवसात जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो.