Marathi News : यूएफओशी संबंधित घटनांमुळे अमेरिका नेहमीच चर्चेत असते. तसेच युरोपमधील प्रेमब्रोक ब्रॉडहेव्हन समुद्रकिनाराही एलियनच्या अवागमनाचे केंद्र असल्याची चर्चा नेहमीच होते.
अनेकदा या ठिकाणी यूएफओ उतरताना पाहिल्याचा दावा केला जातो, तर कधी विमानातून येथील समुद्रकिनाऱ्यावर यूएफओ दिसल्याच्या कथा सांगितल्या जातात. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी येथील समुद्रकिनाऱ्यावर गोलाकार चित्राकृती आढळून आल्याने या ठिकाणी यूएफओ उतरल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे.
विशेष म्हणजे या गोलाकृतीत एक विशेष आकाराच्या कवटीचे चिन्ह दिसून आल्याने ते एलियन्सनेच बनवले असल्याचा दावाही अनेकांनी केला आहे.
युनायटेड किंगडम लंडनमधील प्रेमब्रोक ब्रॉडहेव्हन समुद्रकिनाऱ्यावर एलियन येतात, असा दावा केला जातो. आकाशात दिसणाऱ्या यूएफओच्या आकाराप्रमाणेच वर्तुळाकृती आकाराचे ठसे या समुद्रकिनाऱ्यावर आढळून आले असून
प्रेमब्रोकशायर काऊंटीच्या ब्रॉडहेव्हन बीचवर फेरफटका मारणाऱ्यांना हे चित्र दिसल्यानंतर तेही थक्क झाले. यूकेच्या सर्वात प्रसिद्ध यूएफओ हॉटस्पॉटपैकी एक असलेल्या या ठिकाणी अशाप्रकारे
रहस्यमय खुणा वाळूमध्ये कोरलेल्या दिसून आल्याने या ठिकाणी एलियन येऊन गेल्याचे तर्क लढवतानाच खुनांमधील कवटीचे चिन्ह एलियननेच सोडल्याचा अंदाजही अनेकांनी व्यक्त केला.
तर काहींनी याच भागातील एका व्यावसायिकाने त्याच्या व्यवसायाच्या ब्रँडिंगसाठी अशाप्रकारचे चित्र वाळूमध्ये कोरून या भागातील लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. वाळूतील कवटीच्या खुणा या व्यावसायिकाचे व्यापार चिन्ह असल्याचेही बोलले जात आहे.