Surya Rashi Parivartan : सनातन धर्मात सर्व ग्रहांना विशेष महत्व आहे. ग्रहांच्या हालचालींचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम दिसून येतो. अशातच ग्रहांचा राजा म्हटला जाणारा सूर्य देव एप्रिल महिन्यात मेष राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव देखील सर्व 12 राशींवर दिसून येणार आहे. या काळात काही राशींना फायदा होणार आहे तर काहींना नुकसान. आज आपण अशा राशींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्यावर सूर्य देवाचा आशीर्वाद असेल.
कुंभ
सूर्य देवाच्या राशी बदलामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी जास्तीत जास्त फायदा होणार आहे. या काळात व्यवसायाच्या कामासाठी परदेश दौऱ्यावर जाऊ शकता. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल.
तसेच तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल. व्यवसायात नवीन योजना सुरू केल्याने तुम्हाला अपेक्षित नफाही मिळेल. पालक आपल्या मुलांकडून चांगली बातमी ऐकू शकता, ज्यामुळे कुटुंबात समृद्धी येईल. कोणाकडूनही कर्ज घेणे टाळा. व्यवसायात पदोन्नतीची शक्यता आहे.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना कामाच्या दृष्टीने खूप चांगला मानला जात आहे. नोकऱ्या बदलण्याचा विचार करत असलेल्या लोकांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. या कालावधीत प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. पालकांच्या सहकार्याने नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा पूर्ण होईल.
तसेच वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील. भविष्याची चिंता असलेल्या लोकांच्या समस्या दूर होतील. मित्रासोबत फिरण्याची योजना बनवता येईल.
विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा. त्यामुळे त्यांना परदेशात नव्या संधी मिळतील.
कन्या
सूर्य देवाच्या राशीतील बदलामुळे कन्या राशीच्या लोकांचे भाग्य बदलणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. जुन्या योजनेची सुरुवात चांगली नसेल तर देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व समस्या दूर होतील.
कुटुंबासोबत फिरण्याचे बेत आखता येतील. ज्यामुळे कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या व्यस्त शेड्युलमुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नसाल, तर ही चांगली वेळ आहे जेव्हा तुम्ही वेळ काढून तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकाल.
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी, सूर्य देवाच्या राशी बदलाचा सकारात्मक परिणाम होईल. या काळात तुम्ही कामाच्या ठिकाणी कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्याल, जेणेकरून तुम्हाला भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही.
ईर्ष्यावान लोकांपासून सावध राहणे आवश्यक आहे. कारण ते तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात. जोडीदारासोबत सुरू असलेली नाराजी दूर होईल. राजकीय कार्यात मोठ्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. बंगला, कार इत्यादी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला मानला जातो.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी सूर्य देवाचा राशी बदल लाभदायक ठरेल. कारण या राशीचा स्वामी सूर्य देवासोबतच चौथ्या भावात भ्रमण करणार आहे. त्यामुळे तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. व्यवसायात तुम्हाला अनेक पटींनी अधिक नफा मिळेल. या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.