Surya Guru Yuti 2024 : ज्योतिष शास्त्रात ग्रहांच्या हालचालीला विशेष महत्व आहे. जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा विशेष योग तयार होतात, ज्याचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो. अशातच ज्ञान, संपत्ती, संतती, धार्मिक आणि दान यांचा कारक मानला जाणार गुरु मेष राशीत प्रवेश करणार ज्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येईल.
दरम्यान, एप्रिलमध्ये सूर्य देखील या राशीत प्रवेश करेल आणि महिनाभर येथे राहील. सूर्य आदर, ऊर्जा, यश, नोकरी आणि शक्तीचा कारक मानला जातो. 14 एप्रिल रोजी ग्रहांचा राजा सूर्य आणि मेष राशीत प्रवेश करेल तेव्हा गुरू आणि सूर्याचा विशेष संयोग होईल. ज्याचा प्रभाव 1 मे पर्यंत राहील. अशा स्थितीत दोन मोठ्या ग्रहांची ही भेट सर्व राशींवर परिणाम करेल. पण 6 राशींवर याचा जास्त परिणाम दिसून येईल. कोणत्या आहेत त्या राशी चला पाहूया.
मेष
मेष राशीच्या लोकांवर ग्रहांच्या या संयोगाचा शुभ प्रभाव पडेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. पदोन्नती मिळू शकते. उत्पन्नही वाढू शकते.
वृश्चिक
या राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि गुरूचे मिलन फायदेशीर ठरेल. यशाची शक्यता असेल. कोर्टाशी संबंधित कामात यश मिळेल. व्यवसायासाठी हा काळ उत्तम राहील.
मिथुन
मिथुन राशीला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. करिअरशी संबंधित बातम्या मिळतील. व्यवसायाचा विस्तार होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना नफा कमावण्याची संधी मिळेल.
कर्क
कर्क राशीच्या लोकांना सूर्य आणि गुरूच्या संयोगाचा फायदा होईल. व्यवसाय आणि करिअरमध्ये फायदा होईल. पगारात वाढ होऊ शकते. जीवनात आनंद मिळेल.
सिंह
सिंह राशीच्या लोकांवर या संयोगाचा शुभ प्रभाव राहील. पद आणि प्रतिष्ठा वाढेल. प्रगतीचे दरवाजे उघडतील. उत्पन्न वाढू शकते. हा काळ व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनासाठी उत्तमअसेल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांना करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळेल. मेहनतीने केलेल्या कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. नशीब तुमच्या बाजूने असेल.