लाईफस्टाईल

Surya Ketu Yuti : कन्या राशीत सूर्य आणि केतूचा महासंयोग, तीन राशी होतील मालामाल !

Surya Ketu Yuti : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालींना विशेष महत्व आहे, ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा विशेष योग, राजयोग तसेच ग्रहांचा विशेष संयोग तयार होतो, ज्याचा फायदा इतर १२ राशींवर दिसून येतो, जानेवारी महिन्यात देखील काही विशेष योग तयार होत आहेत, ज्याचा फायदा वृश्चिक, धनु, कर्क राशींच्या लोकांना होणार आहे.

नऊ ग्रहांमध्ये सूर्य आणि केतू या दोन्ही ग्रहांना खूप महत्त्व आहे. सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. तर केतू हा भ्रामक ग्रह आहे. अशास्थितीत दोन्ही ग्रहांचा संयोग अशुभ मानला जातो. पण काही राशींवरही याचा शुभ प्रभाव पडतो. 16 सप्टेंबर रोजी सूर्य कन्या राशीत प्रवेश करेल. 17 सप्टेंबर रोजी या राशीमध्ये सूर्य आणि केतूचा यांचा संयोग होईल. जो तीन राशींसाठी खूप खास असेल…

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी केतू आणि सूर्याचा हा संयोग खूप खास असेल, या काळात त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात देखील लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. प्रगतीची संधीही मिळेल. एकूण हा संयोग तुमच्यात आत्मविश्वास घेऊन येईल.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि केतूची मिलन खूप शुभ राहील. या काळात नोकरीच्या नवीन संधी मिळतील. व्यवसायातही फायदा होईल. वडिलांचे सहकार्य मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.

कर्क

कर्क राशीच्या लोकांवर सूर्याची विशेष कृपा असेल. जीवनशैलीत कोणताही बदल होणार नाही. हे संयोजन विद्यार्थ्यांसाठी शुभ सिद्ध होईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. एकूणच हा संयोग खूप काही घेऊन येणार असेल.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts