Surya Shani Yuti 2024 : शनी वर्षभर स्वतःच्या कुंभ राशीत राहणार आहे. तर १३ फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल. शनि हा सूर्य देवाचा पुत्र आहे. दोघांमध्ये मतभिन्नता आहे. पण कुंडलीत या दोन ग्रहांचा संयोग निर्माण झाल्यामुळे काही राशीच्या लाभ होणार आहे. 14 फेब्रुवारी रोजी ग्रहांचा राजा आणि शनि यांचा संयोग होणार आहे. त्याचा प्रभाव १४ मार्चपर्यंत राहील. दोन्ही ग्रहांच्या मिलनाचा सर्व 12 राशींवर परिणाम होईल. पण काही राशींना याचा अधिक लाभ होईल, कोणत्या आहेत त्या राशी चला पाहूया…
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनि अत्यंत लाभदायक ठरतील. या काळात तुमचा बँक बॅलन्स वाढेल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होईल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढेल.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनीचे मिलन खूप शुभ फायदेशीर ठरेल. या काळात मानसिक तणावातून आराम मिळेल. तब्येत सुधारेल. धार्मिक कार्यात रस वाढेल, जो भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांनाही सूर्य आणि शनीच्या मिलनाचा फायदा होईल. करिअर आणि व्यवसायात लाभाची शक्यता आहे. नोकरीचा शोध पूर्ण होईल. तब्येत सुधारेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
सिंह
सिंह राशीच्या लोकांनाही या संयोगाचा फायदा होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. पदोन्नतीची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम राहील. व्यवसायात लाभ होईल.