Sweets Craving : समजा तुम्हाला सतत गोड खाण्याची आवड असेल आणि तुम्ही सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सतत काही ना काही गोड खात असल्यास तुमची ही इच्छा तुमच्या शरीरात काही कमतरता असल्याचे संकेत देते. परंतु जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ले तर शरीरावर त्याचा परिणाम होतो.
जास्त साखर खाल्ल्याने मधुमेह, लठ्ठपणा, रक्तदाब आणि नैराश्य यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकांना रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय असते, असे केल्याने दात दुखायला लागतात. अनेकांच्या दातांना कीड लागते. शिवाय इतर समस्यांना देखील सामोरे जावे लागते. जर तुम्हाला अशी सवय असेल तर वेळीच सावध व्हा. नाहीतर तुम्हाला त्याचा खूप वाईट परिणाम सहन करावा लागू शकतो. कसे ते जाणून घ्या.
समजा जर तुम्हाला सतत काही ना काही गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर त्याच्या पाठीमागे अनेक कारणे असू शकतात. यापैकी एक कारण म्हणजे तुमच्या पचनसंस्थेशी संबंधित आहे. समजा पचन नीट होत नसेल तर मिठाई खाण्याची इच्छा वाढत जाते. तसेच हार्मोनल असंतुलन, पोटात जंत होणे, खूप ताण घेणे, लहानपणापासूनच खूप गोड खाण्याच्या सवयीमुळे मिठाई खाण्याची इच्छा होते. अशा स्थितीत मिठाई खावीशी वाटण्याचे कारण म्हणजे या मिठाईतून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.
असू शकते हे कारण
असे ठेवा नियंत्रण