लाईफस्टाईल

बापरे ! ‘अशा’ पद्धतीने लीक झाला 81 कोटी लोकांचा डेटा, सरकारनेच दिली ‘ही’ धक्कादायक माहिती, तुम्हीही यात आहात का? पहा..

Marathi News : सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. त्यामुळं अनेक गोष्टी ऑनलाईन होतात. परंतु बऱ्याचदा याचा मोठा तोटा सहन करावा लागतो. अनेकदा आपला डेटा लीक झाल्याच्या न्यूज येत असतात. नुकतीच काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती की ज्याने सर्व भारतीयांना धक्का बसला होता.

एकाच वेळी 81 कोटी लोकांचा डेटा लीक झाल्याचं या बातमीत म्हटलं होतं. आता आयसीएमआरने यावर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे की जो डेटा लीक झाला तो डेटा कोणत्या व कशा प्रकारे लीक झाला होता. कोरोना काळात भारत सरकारने अनेक ऑनलाइन पोर्टल उघडले.

ज्याद्वारे लोकांना कोरोनाविषयी माहिती दिली जय व कोरोना रुग्णांची माहिती मिळू शकते. या सर्व पोर्टलवर सर्वात आधी रुग्णाची आधार बाबत माहिती संकलित केली जात होती, जेणेकरून कोरोना रुग्णाची ओळख पटेल आणि हा आजार आणखी पसरू नये हा त्यामागचा हेच होता.

डेटा चोरी नाही तर लीक झाला

कोणीतरी या पोर्टलची माहिती लीक केली आहे. आयसीएमआरचे म्हणणे आहे की, डेटा लीक झाला आहे, चोरीला गेला नाही. चोरी आणि लीक यात बराच फरक आहे. झालं असं की, कोविड काळात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या सर्व पोर्टल्सचा डेटाबेस ठेवण्यासाठी सर्व्हर तयार करण्यात आला. अशाच काही सर्व्हरचा डेटा तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लीक केला आहे.

यापूर्वीही सायबर हल्ले झाले आहेत

या डेटा लीक बाबत ठोस माहिती समोर आली आहे. पुढील तपास सुरू असून येत्या दोन ते तीन महिन्यांत आरोपीला अटक होण्याची शक्यता आहे. आयसीएमआरची वेबसाईट अनेकवेळा हॅक करण्यात आली आहे.

याआधीही डेटा लीक झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण आयसीएमआरच्या अधिकाऱ्यांनी याचा स्पष्ट इन्कार केला होता, पण यावेळी खुद्द अधिकारीच मान्य करत आहेत की, डेटा नक्कीच लीक झाला आहे.

आधार सुरक्षित करा

तुमचे आधार डिटेल्स हॅक झाल्याचं तुम्हाला वाटत असेल तर तुमचं आधार लॉक करा, असं सरकारनं म्हटलं आहे. यामुळे पुढील समस्या टाळण्यास मदत होईल असं म्हटलं आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Marathi News

Recent Posts