Winter Foods : हिवाळ्याची नुकतीच सुरुवात झाली असून, थंडीमध्ये वातावरण बदल हे होत राहत असतात. यामुळे अनेकदा थंडीमध्ये आजारी पडण्याची शक्यता असते. मात्र आहारामध्ये योग्य भाज्यांचा समावेश केल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे हिवाळ्यामध्ये होणाऱ्या आजारांपासून आपला बचाव होतो. जाणून घ्या या भाज्यांबद्दल.
दरम्यान, बदलत्या हवामानामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. ज्यामुळे अनेक लोकांना थंडीमध्ये सर्दी आणि फ्लू होतात. मात्र योग्य आहार घेतल्यास तुम्ही निरोगी राहू शकता. थंडीमध्ये आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर राहते.
वाटाणा
वाटाणा ही एक अत्यंत उत्तम भाजी आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, ई, झिंक आणि इतर अँटी-ऑक्सिडंटने असल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते. तसेच यामध्ये व्हिटॅमिन ए आणि प्रोटीन सारखे इतर पोषक तत्व देखील यामध्ये आढळतात, जे तुम्हाला हिवाळ्यात निरोगी ठेवण्यास मदत करतात.
कोथिंबीर
आपल्या स्वयंपाक घरात सापडणारी आणि रोजच्या भाज्यांमध्ये वापरली जाणारी कोथिंबीर ही एक शरीरासाठी उपयुक्त भाजी आहे. दरम्यान, ही भाजी आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवते. याचबरोबर शरीरामधील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील उपयुक्त ठरते. दरम्यान, कोथिंबिरीमुळे आपली दृष्टी तर चांगली होतेच पण यामुळे आपली हाडेसुद्धा मजबूत होतात.
पालक
सर्व भाज्यांमध्ये पालक ही सर्वात उत्तम भाजी आहे. अगदी कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर ही भाजी उपयुक्त ठरते. दरम्यान, या भाजीमुळे रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच पण या भाजीमुळे आपली रक्तातील साखर कमी होते. दरम्यान, ही भाजी अनेक गुणांनी समृद्ध असल्यामुळे आपल्यासाठी आरोग्यदायी ठरते. तसेच या भाजीमुळे आपल्या डोळ्याचे आरोग्य ही उत्तम राहते. तसेच हाडे मजबूत होतात.
मेथी
मेथी ही एक उत्तम भाजी ठरते. त्यातील पोषक द्रव्ये तुम्हाला वजन कमी करण्यासाठी तर मदत करतातच पण याच बरोबर मेथीमधील असणारे फायबर इम्युनिटी साठी उत्तम ठरतात. त्यामुळे थंडीमध्ये आहारात मेथीचा समावेश हा फायद्याचा ठरतो .
गवार
गवार ही एक आपल्या शरीरासाठी उत्तम भाजी ठरते. थंडीमध्ये आहारात गवारीच्या भाजीचा समावेश केल्यास आपल्या शरीराला फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात मिळते. यासोबतच गवारीच्या सेवनाने आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते.ही भाजी प्रथिन युक्त असल्यामुळे आपला रक्तदाब सुरळीत ठेवण्यासाठी ही फायदेशीर ठरते. गवारीचे सेवन आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.