लाईफस्टाईल

Ajab Gajab News : एक शहर असे ही…ज्या शहरात तुम्ही कार वापरू शकत नाही !

Ajab Gajab News : स्वित्झर्लंड हा देश जगातील पर्यटकांचे आकर्षण आहे. हा देश निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. त्याचबरोबर या देशातील रस्ते, इमारती आणि छोटे छोटे बंगलेही प्रेक्षणीय आहेत. त्यामुळेच हा देश आपले सौंदर्य जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.

स्वित्झर्लंडमध्ये एक असे शहर आहे की ज्या शहरात वाहने वापरण्यावर कठोर निर्बंध आहेत. हे निर्बंध शहराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी लागू करण्यात आले आहेत. या शहरात कोणाही व्यक्तीला जर स्वतःचे खासगी वाहन वापरायचे असेल तर त्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेणे अनिवार्य आहे.

झेरमॅट असे या शहराचे नाव आहे. या शहराच्या प्रशासनाने नुकत्याच लागू केलेल्या या वाहन वापराबद्दलच्या कठोर नियमांमुळे सध्या हे शहर चर्चेत आले आहे. कारण नियम असे बनवण्यात आले आहेत की या शहरात कोणीही आपली खासगी कार घेऊन येऊ शकत नाही.

तसे करायचे झाल्यास त्यासाठी प्रशासनाची आगाऊ परवानगी घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत आता शहरात प्रवास करण्यासाठी लोकांकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा (पब्लिक ट्रान्स्पोर्ट ) वापर करणे हा एकमेव पर्याय उरला आहे.

झेरमॅटच्या स्थानिक प्रशासनाने खासगी वाहने वापरण्याचा रहिवाशांचा अधिकार काढून घेतला आहे. प्रशासनाने पेट्रोल- डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेश बंदी केली आहे.

याव्यतिरिक्त, शहरात राहणारे आणि वाहनाची आवश्यकता असलेल्यांनी विशेष परवान्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज मंजूर झाल्यास त्यांना परिसरात उत्पादित कस्टम-बिल्ट मिनी कार वापरण्यास परवानगी दिली जाते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts