लाईफस्टाईल

Ajab Gajab News : सूर्यमालेतील हा ग्रह अचानक होतोय बारीक ! वैज्ञानिकांनी दिली महत्वाची माहिती

Ajab Gajab News : आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान तसेच सूर्यापासून सर्वात जवळ असलेल्या बुध ग्रहाचा आकार अब्जावधी वर्षांपासून कमी होत चालला आहे. ग्रहाच्या भूगर्भातील तापमान बाहेर पडत असल्याने त्याचा अंतर्गत भाग थंड होत आहे. त्यामुळे हा ग्रह ज्या खडकांनी बनला आहे ते आकुंचन पावत असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

अब्जावधी वर्षांपासून बुध ग्रहाचा आकार कमी होत असल्याचे माहिती असले तरीही आकारमान घटण्याच्या प्रमाणाबाबतचे गूढ कायम आहे. तसेच ही प्रक्रिया आणखी किती काळ चालेल याबाबत देखील अंदाज बांधणे कठीण आहे.

पण नव्या अभ्यासानुसार या ग्रहाचा अंतर्गत भाग आकुंचन पावत आहे. ही प्रक्रिया सफरचंद जुने झाल्यानंतर ज्याप्रमाणे त्यावर सुरकुत्या पडतात तशी आहे. यात फरक इतकाच आहे की, एक सफरचंद वाळत असल्याने आकुंचन पावत असतो.

तर बुध ग्रह गाभ्यातील तापमान निघून जात असल्याने आकसत चालला आहे, असे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. या ग्रहाचा आकार घटत चालल्याचे पहिले पुरावे १९७४ मध्ये समोर आले होते. मेरिनर १० मिशनने या ग्रहावरील शेकडो किमी पसरलेल्या उताराचे छायाचित्र जारी केले होते.

मॅसेजर नामक मोहिमेने २०११ ते २०१५ या काळात या ग्रहाभोवती घिरट्या घातल्या होत्या. त्यावेळी देखील या ग्रहाच्या सर्व बाजूने असे उतार पाहायला मिळाले होते. थ्रस्ट फॉल्ट म्हणजेच भूगर्भीय दोषामुळे बुध ग्रहावर अशा उताराची निर्मिती होत आहे.

यामुळे बुध ग्रहाच्या त्रिज्येत जवळपास ७ किमी घट झाल्याचा अंदाज आहे. या ग्रहावरील बहुतांश उतार हे जवळपास ३ अब्ज वर्ष जुने असल्याचे मानले जाते. पण त्याखालील थ्रस्ट आजही सक्रिय आहेत का? हा मोठा प्रश्न आहे.

तरीही प्रत्येक उताराखालील थ्रस्ट फॉल्ट फक्त एकच वेळेस सक्रिय झाला असावा, अशी आपण आशा करू शकतो, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. पृथ्वीवर देखील थ्रस्ट फॉल्टचा अनुभव आपल्या सर्वांना आल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले.

२०११ मध्ये जपानमध्ये ९ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप आला होता. एका थ्रस्ट फॉल्टच्या १०० किमी लांबीसोबत २० मीटरच्या अचानक उसळीमुळे हा प्रकार घडला होता, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. यासंबंधीचे सविस्तर संशोधन नेचन जियोसाइन्स नामक नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts