लाईफस्टाईल

Ajab Gajab News : समुद्रातच राहते ही अनोखी मानवी जमात !

Ajab Gajab News : जगाच्या पाठीवर मानवाच्या अशा अनेक जमातींबद्दल आपण ऐकून आहोत. यातील काही जमातींना आजही आधुनिक विज्ञानाने उपलब्ध झालेल्या सोयिसुविधांचा गंधही नाही. या जमाती आजही आदिम काळात जगत आहेत.

अशीच एक जमात फिलिपाईन्समध्ये अस्तित्वात आहे. या जमातीचे वैशिष्ट्य म्हणजे या जमातीतील लोक जमिनीवर कमी आणि समुद्रामध्ये जास्त काळ वास्तव्य करून असतात. समुद्राच्या पोटातील जलचर हेच त्यांचे जगण्याचे एकमेव साधन आहे.

हे लोक समुद्रात शीरून सुमारे २०० फूट खोलीपर्यंत जातात. त्यासाठी ते ऑक्सिजन सिलिंडर वगैरे आधुनिक साधनांचा उपयोग करत नाहीत. किंबहुना या साधनांची त्यांना कल्पनादेखील नाही. ते केवळ आपला श्वास रोखून समुद्राच्या पोटात शिरतात आणि समुद्री जिवांची शिकार करतात.

फिलिपाईन्सच्या समुद्रकिनाऱ्याच्या आसपास आढळून येणाऱ्या या अनोख्या जमातीचे नाव ‘बजाऊ’ असे आहे. ही जमात संपूर्ण जगातील एक विचित्र अशी जमात आहे. बजाऊ जमातीचे लोक पोहोण्यामध्ये पटाईत असतात.

कारण लहानपणापासूनच त्यांना समुद्रामध्ये वावरण्याचे प्रशिक्षण आपसूक मिळते. हे लोक जमिनीवर फार कमी वेळ दिसतात. त्यांचा जास्तीत जास्त वेळ समुद्रामध्ये जलचरांची शिकार करण्यात जातो.

असे सांगितले जाते की, शेकडो वर्षांपूर्वी फिलिपाईन्समधील लोकांनी या जमातीला जमिनीवरून हाकलून लावले होते. तेव्हापासून या जमातीने समुद्र हेच आपले वसतिस्थान बनवले आहे. या जमातीला समुद्रातील भटकी मानवी जमात, असेही म्हटले जाते. समुद्रात बांबू रोवून त्यावर बांधलेल्या झोपड्यांमध्ये हे लोक राहतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts